उत्तराखंडच्या सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 मजुरांची 16 दिवसांनंतर मंगळवारी रात्री सुखरूप सुटका करण्यात आली. बोगद्यातून सुटका केल्यानंतर सर्व कामगारांना सामुदायिक आरोग्य केंद्रात ठेवण्यात आले आहे. जिथे सर्व कामगारांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. 12 नोव्हेंबरच्या दिवाळीच्या रात्री बोगद्याचा काही भाग कोसळल्याने हे सर्व कामगार अडकले होते. त्यानंतर एनडीआरएफसह इतर बचाव पथक त्यांना वाचवण्यात व्यस्त होते आणि 17 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सर्व कामगारांना वाचवण्यात यश आले. बाहेर आल्यानंतर हे सर्व कामगार अतिशय आनंदी दिसत होते.
पाहा पोस्ट -
#WATCH | Medical checkup of 41 workers who were successfully rescued from Silkyara Tunnel is underway at Chinyalisaur Community Health Centre pic.twitter.com/hMkaSqu1eQ
— ANI (@ANI) November 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)