Covishield Price: SII कोविशिल्ड लस खाजगी बाजारात 1000 रूपयांना तर  GoI ला पहिले 100 Mn डोस प्रति 200 रूपयांना विकणार
Adar Poonawalla-Covishield (Photo Credits: Twitter)

सीरम इन्स्टिट्युटचे मालक आणि सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla, CEO-Owner, Serum Institute of India) यांनी कोविशिल्ड (Covishield) ही त्यांची कोविड 19 वरील लस खाजगी बाजारात 1000 रूपयांना विकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान ANI वृत्तसंस्थेला आज माहिती देताना पूनावाला यांनी भारत सरकारच्या मागणीवरून केवळ त्यांना 200 रूपये इतक्या माफक दरामध्ये पहिले 100 मिलियन डोस उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'आम्हांला सरकारला मदत करण्यासोबतच गरीब, आरोग्य कर्मचारी वर्गापर्यंत ही लस पोहचवणं याला प्राधान्य होतं. त्यामुळे 100 मिलियन डोस नंतर खाजगी बाजारात हीच लस 1000 रूपयांना उपलब्ध असेल. ' असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. COVID19 Vaccine: पुणे येथील सीरम इंस्टिट्युट मधून कोविशिल्ड लस आज देशातील 13 ठिकाणी पोहचवली जाणार.

लसीमधून नफा मिळवणं हे सध्या आमचं उद्दिष्ट नाही. लसीचा दर हा सरकारसाठी माफक ठेवण्यात आला आहे. मात्र त्याच्या मूळ निर्मितीचा खर्च नक्कीच त्यापेक्षा थोडा अधिक आहे. भारतासोबतच आफ्रिका आणि साऊथ अमेरिका मध्येही आम्ही लस पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेकांकडून भारत सरकारकडे लसीच्या पुरवठ्याबाबत मागणीची पत्र येत आहे. सहाजिकच आम्हांला सार्‍यांना खूष ठेवायचं आहे. पण भारताची गरज देखील आम्ही पाहत आहोत. Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

ANI Tweet

सीरम मध्ये दर महिन्याला 70-80 मिलियन डोस बनत आहेत. त्यानुसार आम्ही आता भारतामध्ये किती आणि भारताबाहेर किती डोस द्यायचे याचे नियोजन करत आहोत. आरोग्य मंत्रालयाने याचा लॉजिस्टिक प्लॅन केला आहे. ट्रक, व्हॅन आणि कोल्ड स्टोरेजसाठी आम्ही खाजगी कंपन्यांसोबत काम करत असल्याचेही पुनावाला यावेळेस एएनआय शी बोलताना म्हणाले आहेत.