स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआ ला बलात्काराची धमकी देणाऱ्या शुभम मिश्रा याला अटक, अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिला होता आदेश
Shubham Mishra (Photo Credit: Twitter)

शिवाजी महाराजांचा (Chhtrapati Shivaji Maharaj)  एकेरी उल्लेख केलेल्या स्टॅन्ड अप कॉमेडियन अग्रीमा जोशुआ (Agrima Joshua)  हिचे नाव काही दिवसात बरेच चर्चेत आले आहे. शिवभक्तांनी अग्रीमा वर कारवाईची सुद्धा मागणी केली आहे. मात्र काही अतिउत्साही मंडळींनी सभयतेच्या सीमा ओलांडून अग्रीमाला शिव्या देण्याचे प्रकार सुद्धा केले. यापैकी असाच एक तरुण शुभम मिश्रा (Shubham Mishra) याने एक व्हिडीओ पोस्ट करून त्यामार्फत अग्रीमाला बलात्काराची धमकी दिली होती,स्वर भास्करने (Swara Bhaskar)  या व्हिडिओला शेअर करत अनिल देशमुख (Anil Deshmukh)  व महाराष्ट्र पोलीस  (Maharashtra Police) यांना माहिती दिली होती तसेच कारवाईची मागणी सुद्धा केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. या नुसार आता वडोदरा (Vadodara)  पोलिसांनी शुभम मिश्राला अटक केल्याचे समजत आहे.

शुभम मिश्रा याने पोस्ट केलेल्या व्हिडीओ मध्ये अग्रीमा जोशुआ च्या विरुद्ध अनेक वाईट कमेंट्स केलाय होत्या. तिला जीवे मारण्याची आणि नालात्काराची धमकी सुद्धा या तरुणाने दिली होती. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा या व्हिडिओचा निषेध करत अग्रीमाची बाजू घेतली होती. तसेच महिलांचा अपमान करणे हे शिवभक्तांना शोभणारे निश्चितच नाही, शिवाजी महाराजांची ही शिकवण नाही असे म्हणत अनिल देशमुख यांनी सुद्धा या व्हिडिओवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते.

शुभम मिश्राचा व्हायरल व्हिडीओ

स्टॅन्ड अप कॉमेडियन Agrima Joshua ला बलात्कारची धमकी देणाऱ्या Shubham Mishra याला अटक - Watch Video

शुभम मिश्रा हा तरुण एक सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसार आहेत. त्याचे स्वतःचे युट्युब चॅनेल आहे आणि तो इंस्टाग्राम च्या माध्यमातून सुद्धा लोकांशी संपर्कात असतो. तो वडोदरा येथील रहिवाशी आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने सुद्धा याप्रकरणी गुजरात पोलिसांकडे तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली होती. अखेरीस आता त्याला अटक करण्यात आली आहे.