दिल्ली (Delhi) मध्ये एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. महाराष्ट्रीयन श्रद्धा वालेकरचा (Shraddha Walkar) तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब (Aftab Poonawalla) कडून अमानुष खून झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तब्बल 6 महिन्यांनंतर या हत्याकांडाचा सुगावा लागल्यानंतर त्यामधील खुलासे अंगावर काटा आणणारा आहेत. मृत श्रद्धा वालेकर चे वडील यांनी आज (15 नोव्हेंबर) या घटनेवर आपली प्रतिक्रिया देताना मुलीच्या हत्येमागे लव्ह जिहादचा (Love Jihad) संशय व्यक्त केला आहे तर आफताबला मृत्यूदंड व्हावा अशी मागणी केली आहे.
ANI सोबत बोलताना श्रद्धाचे वडील विकास वालेकर यांनी 'दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास आहे. आमचा या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय आहे. पोलिस सध्या योग्य दिशेने तपास करत आहेत. श्रद्धा माझ्यापेक्षा तिच्या काकाशी अधिक जवळ होती. माझ्याशी तिचं फार बोलणं होत नव्हतं. मी कधीच आफताब सोबत संपर्कामध्ये नव्हतो. मी पहिली तक्रार मुंबईच्या वसई मध्ये केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, Aftab Poonawalla हा फूड ब्लॉगर होता. दिल्लीत तो कॉल सेंटर मध्येही काम करत होता. दिल्लीमध्ये तो Chhatarpur भागात भाड्याच्या घरामध्ये राहत होता हा त्याच्या हत्येच्या कटाचा भाग होता का? याचा तपास आता पोलिस करत आहेत. त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार आता त्यांच्याकडून Bumble शी संपर्क साधून आफताब शी संपर्कात असलेल्या मुली कोणकोण होत्या याची प्रोफाईल वरून माहिती घेण्याचा प्रयत्न असेल. श्रद्धाचा मृतदेह फ्रीज मध्ये ठेवण्यात आला होता. त्यावेळी कोणत्या मुलींना तो भेटला आणि त्यांच्यापैकी कुणी या हत्येशी निगडीत आहे का? याचा देखील तपास केला जाणार आहे.
श्रद्धाचा मृत्यू 18 मे दिवशी झाला आहे. मृत्यू पूर्वी काही दिवस आधीच हा फ्लॅट भाड्याने घेण्यात आला होता. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट होता का? याकडेही लक्ष दिले जाणार आहे. आफताबचे कुटुंबिय देखील मुंबई मध्ये राहत होते. त्याचा फूड ब्लॉगचा व्हिडिओ देखील फेब्रुवारी महिन्यात शेवटचा पोस्ट झालेला आहे. त्याच्या इंस्टा प्रोफाईल वर 28 हजार फॉलोवर्स आहेत.
श्रद्धाच्या मैत्रिणीकडून तिच्याशी काहीही कॉन्टॅक्ट न झाल्याचं समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने मुंबईत श्रद्धाच्या वडिलांकडून तक्रार नोंदवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतलं असून त्याने खूनाची कबुली दिली आहे. आज त्याला घेऊन पोलिसांनी जेथे श्रद्धाच्या शरीराचे तुकडे फेकले गेले आहेत तेथे जाऊन तपास करण्यास सुरूवात झाली आहे.