Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे विधान गांभीर्याने घेत केंद्र सरकारने चीन आणि पाकिस्तान (China and Pakistan) यांच्यावर सर्जिकल स्ट्राईक (Surgical Strike) करावा असा टोला शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Shiv Sena) यांनी लगावला आहे. एखाद्या केंद्रीय मंत्र्याने अशा प्रकारचे विधान केले असेल तर ते गंभीर आहे. रावसाहेब यांच्या विधानाप्रमाणे केंद्राकडे खरोखरच जर अशी माहिती असेल तर, केंद्राने योग्य ती कडक कारवाई करावी, अशी मागमी आम्ही देशभक्त म्हणून करत आहोत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, जर देशांतर्गत विषयांमध्ये देशाबाहेरील शक्ती कार्यरत असतील तर केंद्र सरकारने त्याचा शोध घ्यावा. भारतीय लष्कराच्या तीन्ही प्रमुखांना एकत्र बोलवून एक पंतप्रधानांनी एक बैठक घ्यावी आणि या शक्तिंवीरोधात कारवाई करावी. केंद्रीय मंत्री जेव्हा एकादी गोष्ट बोलतो तेव्हा शिवसेना ती गोष्ट गांभीर्याने घेते, असेही संजय राऊत या वेळी म्हणाले.

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथे आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा काल (बुधवार, 9 डिसेंबर 2020) पार पडला. या सोहळ्याला रावसाहेब दानवे हजर होते. या वेळी बोलताना देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी खळबळजनक विधान केले. रावसाहेब दानवे यांनी म्हटले की, देशात कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. (हेही वाचा, Farmer's Protest: कृषी विरोधातील शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तान चा हात; रावसाहेब दानवे यांचा अजब दावा)

दरम्यान, केंद्र सरकारने संमत केलेला कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या कायद्याला पाठिंबा द्यायला पाहिजे. या कायद्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यांच्या थेट शेतात जातील आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देतील, असा फायद्याचा हा कायदा आहे. परंतू, काही लोक त्याला विरोध करत असल्याचेही दानवे या वेळी म्हणाले.