Indian Share Market | photo Credits: Twitter

दिल्ली विधानसभा निवडणुक निकालाच्या (Delhi Vidhansabha Elections Results) दिवशी मुंबई मध्ये शेअर बाजारात (Share Market) मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स (Sensex) तब्बल 328 अंकांनी वर आला असून 41,308.16 वर पोहचला आहे. तर निफ्टी (Nifty) मध्ये सुद्धा 107.20 पॉइंट्सची वाढ झाली असून 12,135.80 चा टप्पा गाठला आहे. याशिवाय आज सकाळीच डॉलरच्या (Dollar) तुलनेत रुप्याच्या किंमतीत आठ पैश्याने वाढ झाल्याचे समजतेय. Delhi Assembly Election Results 2020 Live Updates: उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दीड हजार मतांनी पिछाडीवर; 'आप' ला धक्का

जागतिक बाजारपेठेत होणाऱ्या मोठ्या उलाढालीमुळे देखील शेअर बाजार वर निफ्टीमध्ये प्रभाव दिसून आला आहे. याशिवाय आज सकाळ पासून आशियातील इतर शेअर बाजारात सुद्धा मोठी गती दिसून आली आहे. सिंगापूरचा शेअर बाजार 44 अंकांनी वधारला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारात सुद्धा तेजी दिसून आली आहे.दरम्यान, आज अनेक मोठ्या व्यवसायांचे तिमाही निकाल जाहीर होत आहेत. आज कोल इंडिया आणि भेल या दोन सार्वजनिक कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत.

PTI ट्विट

प्राप्त माहितीनुसार, शेअर बाजारात सर्वाधिक सकारत्मक प्रभाव आयटी, पाॅवर, टेक, वित्त सेवा, बांधकाम, इन्फ्रा, तेल आणि वायू, बँकेक्स, आॅटो या क्षेत्रात दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर एसबीआय, आयसीआयसीआय बँक, भरती एअरटेल, टाटा स्टील, एलअँडटी, एचयूएल, नेस्ले, टायटन, टीसीएस हे शेअर वधारले आहेत.