
लग्न (Marriage) केवळ शरीरसुखासाठी (Sexual Pleasure) की संततीप्राप्तीसाठी? (Progena) लग्न कशासाठी? (Purpose of Marriage) असा आपल्यापैकी अनेकांना नेहमी पडणारा प्रश्न. या कळीच्या प्रश्नाचे उत्तर मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात स्पष्टपणे म्हटले आहे की, केवळ शरीरसुख इतकाच लग्नाचा मर्यादित अर्थ नाही. संततीप्राप्ती हा देखील लग्नाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच संतती आणि कुटुंबाचाही विस्तार होतो असे कोर्टाने नमूद केले. खरे तर संततीप्राप्ती हाच विवाहाचा प्रमुख उद्देश असल्याचे कोर्टाने जोर देऊन सांगीतले. न्यायमूर्ती कृष्णन रामास्वामी यांच्या एकल न्यायाधीशाच्या पीठासमोर अल्पवयीन मुलाचा ताबा घेण्याबाबत आलेल्या खटल्यावर सुनावणी सुरु होती. या वेळी न्यायालयाने ही टीप्पणी केली.
न्यायाधीश कृष्णन रामासामी यांनी म्हटले की, विभक्त जोडप्यांनी मुलांचा ताबा मागण्यासाठी खटले दाखल करताना हे भान ठेवावे की, लग्नाचा उद्देश केवळ शरीरसुख इतकाच मर्यादित नाही. तर संततीप्राप्ती हा देखील आहे. त्यामुळे आपण जन्मास घातलेल्या संततीला दोघांनी मिळून आनंद द्यावा.पण आपल्यातील वादामुळे त्यांना वेगल्या पद्धतीने या जगात आणले जात आहे. या खटल्यात वकील पत्नीने कोर्टात तक्रार केली होती की, तिचा वकील पती तिला आपल्या मुलांना भेटू देत नाही. तसेच, कोर्टाने दिलेल्या आदेशाचेही पालन करत नाही. त्यामुळे पत्नीने कोर्टात दाद मागितली. तसेच, एका पेरेंटल एलिएनेशन (एका पालकाकडून मुलांना दुसऱ्या पालकांपासून दुर राहण्यासाठी भडकवणे) झाल्याचा आरोप केला. (हेही वाचा, Shocking News: नवरा जोमात बायको कोमात, आठ वर्षे संसार केला, पुरुष पती बाई निघाला; जाणून घ्या धक्कादायक घटना)
पेरेंटल एलिएनेशन हे एकप्रकारचे अमानवी कृत्य आहे, असे सांगत न्या. रामसामी म्हणाले, मुलांना एका पालकांने दुसऱ्या पालकाविरुद्ध भडकवणे, दूर करणे हे भविष्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मुलांचे संगोपण आणि त्याच्या वाढ, विकास आणि आयुष्यासाठी आई-वडील (पालकांचे) दोन्ही हात त्याच्या सोबत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.