Sexual Harassment | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

बंगळुरु (Bengaluru) येथील एका महिला मॉडेलने बाईक टॅक्सी एग्रीगेटर प्लॅटफॉर्म रॅपिडो (Bike Taxi Aggregator Platform Rapido) स्वाराविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीत तिने त्याच्यावर लैंगिक छळ (Sexual Harassment) केल्याचा आरोप केला आहे. आयएएनएस वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार मॉडेल ही 21 वर्षीय पीडिता आहे. ती मॉडेलींगसोबतच डबिंक कलाकार म्हणूनही काम करते.

बंगळुरु शहरातील हेन्नूर पोलिसांमध्ये पीडितेने बुधवारी (14 नोव्हेंबर) तक्रार दिली. मॉडेलने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीचे नाव मंजुनाथ टिप्पस्वामी (Manjunath Tippeswamy) असे आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत प्लॅटफॉर्मचे नावही दिले आहे. (हेही वाचा,Crime: विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी वसतिगृहाच्या दोन आचाऱ्यांना अटक )

पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिने (पीडिता) काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी रात्री 10.30 वाजता जक्कूर ते बाबूसाबपल्यापर्यंत एक रॅपिडोवर KA51 H 5965 या नोंदणी क्रमांकाने दुचाकी बुक केली होती. नियोजीत वेळेत आणि नोंदणी केल्यानुसार बाईकस्वार तिथे आला. मात्र, त्याने ओटीपी घेतला नाही. त्याने तिलाच रस्ता दाखविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास सांगितले.

ट्विट

पीडितेने पुढे म्हटले की, जेव्हा तिने रस्ता सांगण्यास सुरुवात केलीतेव्हा आरोपीने तिला पाठिमागून स्पर्ष करण्यास सुरुवात केली. आरोपीने तिला तिच्या प्रायव्हेट भागालाही स्पर्ष केला. तसेच तिला अव्यवस्थित वाटेल, मनात लज्जा निर्माण होईल असा त्रास दिला, असे पीडितेने सांगितल्याचे पोलिसांनी म्हटले.