Mumbai Shocker: मुंबई एका 18 वर्षीय तरुणीचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिनेमा आणि मालिकेत काम करण्याचे आमिष दाखवून तरुणाचा व्हिडिओ शुट केला. या प्रकरणी तीन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीचे अश्लील फोटो, व्हिडिओ बनवून ते एका वेबसाईटवर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. अर्नाळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस पुढील तपास करत आहे. (हेही वाचा-पबमध्ये गेलेल्या महिलेला अनोळखी व्यक्तीच्या घरी आली जाग; )
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला अभिनेत्री बनायचे आहे त्यानुसार ती कामाकडे वळली. मुंबईतील वसई परिसरात राहणारी तरुणी अनेक प्रॉडक्शन मध्ये कामानिमित्त जाऊ लागली. मालिका आणि जाहिरातांत काम करण्यासाठी जात असे. दरम्यान पीडित तरुणीला एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये पूर्णपणे नोकरी मिळाली.महिलेला दुसऱ्या प्रॉडक्शनमध्ये वेब सीरिजमध्ये काम मिळाली.विरार येथे तीला ऑडिशनसाठी येण्यास सांगितले. ती विरार येथे प्रॉडक्शन कंपनीत काम करणाऱ्या चार तरुणांना भेटली. ज्यात एक दिग्दर्शक, एक कॅमेरामन, एक अभिनेता आणि एक महिला मेकअप आर्टिस्ट होता, त्यानंतर ते अर्नाळा बीचवर गेले.
ऑडिशनसाठी एक सीन शूट करायचे पण ते वेब सीरीजमध्ये प्रसारित केले जाणार नाही, असं तरुणीला सांगण्यात आले. शुट झाल्यानंतर तीला कोणाचाही कॉल आला नाही. एका वेबसाईटवर तीचा अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्याबद्दल तिला माहिती दिली. त्यानंतर तीने लगेच पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार नोंदवला गेला. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू होते.