Bengaluru-Woman Wakes In Stranger's Home: पबमध्ये गेलेल्या महिलेला अनोळखी व्यक्तीच्या घरी आली जाग; पीडितेने केला सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित तरुणी शहरातील कोरमंगला भागातील पबमध्ये गेली असता ही घटना घडली. पीडितेला फक्त ती बेशुद्ध झाल्याची आठवण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी व्यक्तीच्या ठिकाणी तिला जाग आली.
Bengaluru-Woman Wakes In Stranger's Home: बेंगळुरू (Bengaluru) एक विचित्र घटना समोर आली आहे. बेंगळुरूस्थित महिला सॉफ्टवेअर अभियंता (Software Engineer) शहरातील एका पब (Pub) ला गेली. मात्र, जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती एका अनोळखी व्यक्तीच्या घरी होती. त्यानंतर तिने आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला आणि याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडित तरुणी शहरातील कोरमंगला भागातील पबमध्ये गेली असता ही घटना घडली. पीडितेला फक्त ती बेशुद्ध झाल्याची आठवण आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी एका अनोळखी व्यक्तीच्या ठिकाणी तिला जाग आली. पीडितेचा दावा आहे की, तिला अडुगोडीजवळील देवेगौडा लेआउटमध्ये नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तिला जाग आल्यावर तिने जवळच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि मदत मागितली.
घरातील रहिवाशांनी पोलिस हेल्पलाइनवर फोन केला आणि औदुगोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. नंतर तिला कोरमंगला पोलिस ठाण्यात नेण्यात आले, तेथे तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - High Court on POCSO Cases: पॉक्सो प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पीडित आणि आरोपी तडजोड करून सुखी वैवाहिक जीवन जगत असल्यास रद्द होऊ शकते केस)
A #Bengaluru-based software engineer woke up at a stranger's home following a visit to a pub in the city after which she filed a police complaint alleging gang rape, sources said on Friday.
The police have started a probe into the incident. pic.twitter.com/istPvTlqvf
— IANS (@ians_india) December 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 15, 2023 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

