High Court on POCSO Cases: पॉक्सो प्रकरणाबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; पीडित आणि आरोपी तडजोड करून सुखी वैवाहिक जीवन जगत असल्यास रद्द होऊ शकते केस
आरोपीने पीडितेशी लग्न केल्यास पॉक्सो कायद्याची प्रकरणे रद्द करता येतील का, याविषयी गेल्या महिन्यात एकल न्यायाधीशाने केलेल्या संदर्भाला विभागीय खंडपीठ उत्तर देत होते.
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने पॉक्सो (POCSO) प्रकरणात एक मोठा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा अंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचे प्रकरण आरोपी आणि पीडित यांच्यातील सामंजस्याच्या आधारे रद्द केले जाऊ शकते. न्यायालयाने म्हटले की, पीडित आणि आरोपीने एकमेकांसोबत तडजोड केली आणि दोघांनाही एकत्र सुखी वैवाहिक जीवन जगायचे असेल, तर अशी केस रद्द केली जाऊ शकते.
न्यायालयाने म्हटले की, ‘या प्रकरणात पीडितेने आधी आरोप केला होता की तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. परंतु नंतर वाद मिटवला आणि तिने आरोपीशी लग्न केले व आता ते दोघे शांततापूर्ण जीवन जगत आहे. अशा काही प्रकरणांमध्ये, लग्न झाल्यानंतर पीडिता समाधानी असेल तर, न्यायालय खटला चालू ठेवू देणार नाही. यामुळे त्यांच्या आनंदी कौटुंबिक जीवनात अडथळा निर्माण होईल.’ मात्र गंभीर, जघन्य आणि भीषण स्वरूपाचे लैंगिक गुन्हे कधीही तडजोडीचा विषय होऊ शकत नाहीत, यावरही न्यायालयाने भर दिला. आरोपीने पीडितेशी लग्न केल्यास पॉक्सो कायद्याची प्रकरणे रद्द करता येतील का, याविषयी गेल्या महिन्यात एकल न्यायाधीशाने केलेल्या संदर्भाला विभागीय खंडपीठ उत्तर देत होते. (हेही वाचा: Menstruation and Paid Leaves: 'महिलांची मासिक पाळी हे अपंगत्व नाही त्यामुळे पगारी रजा देण्याची गरज नाही'- मंत्री Smriti Irani)
POCSO Act case can be quashed to preserve happy married life of accused and victim: Himachal Pradesh High Court
Read story here: https://t.co/TviKoIQnFi pic.twitter.com/78ij3pKa8y
— Bar & Bench (@barandbench) December 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 14, 2023 06:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

