Pulwama Terror Attack: आठवडाभरापूर्वीच जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) येथील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने भरती सुरु केली आहे. बारामुल्ला (Baramulla) येथे 111 पदांसाठी भरती सुरु झाली आहे. याला काश्मिरी तरुणांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. केवळ 111 पदांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज केला आहे. शस्त्र हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही; पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याचा इशारा
लष्कारात भरती होण्यासाठी आलेल्या इच्छुक तरुणांपैकी बलाल अहमद या तरुणाने सांगितले की, "लष्करात भरती झाल्याने आम्हाला आमच्या कुटुंबाचे आणि देशाचे रक्षण करता येईल. यापेक्षा दुसरे काय हवे?"
#WATCH Queues seen at an Army recruitment drive for 111 vacancies in Baramulla earlier today. #JammuAndKashmir pic.twitter.com/BJFbHmBcaL
— ANI (@ANI) February 19, 2019
तर दुसऱ्या एका तरुणाने सांगितले की, "आम्ही काश्मीर बाहेर जावू शकत नसल्याने आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. लष्कराने काश्मीरमधील जवानांना येथील परिसरातच तैनात केलं तर इथली परिस्थिती आम्ही अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकतो." भारताने युद्ध छेडल्यास जशास तसे उत्तर देऊ - इम्रान खान; पुलवामा हल्ल्याचे भारताचे आरोप फेटाळले
14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर देशात एकच संतापाची लाट उठली. अनेक हात मदतीसाठी पुढे सरसावले. तर या हल्ल्यानंतर लष्करात भरती होण्याची इच्छा तरुणांच्या मनी जागृत झाल्याचे चित्र दिसू लागले आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढून घेतला आहे. त्याचबरोबर पिंगलान येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतावाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय सैन्याला यश आले असून 100 तासांच्या आत हल्ल्याचा सुत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात आला.