अरुण जेटली (फोटो सौजन्य-ANI)

Pulwama Terror Attack: पुलावामा येथील दहशतवादी भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. या पार्श्वभुमीवर आज शुक्रवारी (15 फेब्रुवारी) कॅबिनेट सुरक्षा समितीची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यासह नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अन्य मंडळींनी बैठकीसाठी उपस्थिती लावली होती. या बैठकीत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून भारताने आता पाकिस्तानला (Pakistan) प्रतिउत्तर देत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयात भारताने (India) पाकिस्तानकडून 'मोस्ट फेवर्ड नेशन'(Most favoured nation) चा दर्जा काढून घेतला आहे.

अवंतीपुरा येथे सीआरपीएफच्या दहशतवादी ताफ्यावर हल्ला झाल्याने त्यात 44 जवांना वीरमरण आले आहे. मात्र या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या परिस्थितीत आता व्यापार आणि उद्योगात पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने पाकिस्तासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच जम्मू-काश्मीर येथे शांतता कायम राहण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलली जाणार असल्याचे अरुण जेटली यांनी म्हटले आहे. तर दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे चोख प्रतिउत्तर पाकिस्तानला मिळेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा म्हटले आहे.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: 56 इंचाची छाती असलेले पंतप्रधान देशाचं संरक्षण करण्यात अपयशी- शरद पवार)

पाकिस्तान येथे असलेल्या 'जैश-ए-महम्मद' यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच हल्ला करण्यापूर्वी संघटनेने आत्मघाती हल्ला करण्यापूर्वी एक व्हिडिओ शूट केला होता. तर दहशतवादी संघटनेचा कमांडर आदिल अहमद डार हा यामधील आत्मघाती हल्लेखोर असल्याचे संघटनेने सांगितले आहे.