भारतामध्ये पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालांना(Assembly Election Result 2018) सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे कल पाचही राज्यांमध्ये कॉंग्रेसच्या बाजूने झुकलेले दिसले आहेत. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही दिसून आला आहे. आज सकाळी सेन्सेक्स गडगडल्याचं चित्र आहे. 500 अंकांनी सेन्सेक्स (Sensex) तर निफ्टी 150 ((Nifty) अंकांनी गडगडलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी प्रमाणेच रूपयाचेही अवमूल्यन झाले आहे.
Sensex at 34,458.86, down by over 500 points pic.twitter.com/Df7mxEzmxm
— ANI (@ANI) December 11, 2018
एक्झिट पोलच्या पाठोपाठ आज निकालाच्या दिवशीदेखील शेअर बाजार कोसळला आहे. विधानसभा निवडणूक निकाल आणि काल संध्याकाळी गर्व्हनर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे. RBI Governor उर्जित पटेल यांचा राजीनामा
सेन्सेक्स गडगडल्याने रूपयाचेही अवमुल्यन झाले आहे. रूपया 72.42 वर आला आहे. रूपयाची ही घसरण मागील 4 आठवड्यांमधील मोठी घसरण आहे.