जम्मू-कश्मीर मधून कलम 144 रद्द केल्यानंतर उद्यापासून शाळा-महाविद्यालयं होणार सुरु
School (Photo credits: PTI)

मोदी सरकारने जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून कलम 144 रद्द केल्यानंतर आता तेथील परिस्थिती पूर्ववत होत आहे. मात्र जम्मू-कश्मीर सोडून अन्य राज्यात कलम 144 लागू राहणार आहे. कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात येते. मात्र मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे बोलले जात असून त्याचे कौतुक केले जात आहे.

शुक्रवारी जम्मू जिल्ह्यातील डेप्युटी मॅजिस्ट्रेट सुषम चौहान यांनी या राज्यातून कलम 144 रद्द केला आहे. यामुळे आता उद्यापासून (10 ऑगस्ट) शाळा-महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत. कलम 370 अंतर्गत जम्मू-कश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यापूर्वी आणि राज्याचे विभाजन विधेयक मांडण्यापूर्वी संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आला होता. तर 5 ऑगस्ट पासून जम्मू-कश्मीर मध्ये सकाळी 6 वाजल्यापासून कलम 144 लागू करण्यात आला होता. यामुळे तेव्हापासून जम्मू-कश्मीर येथील शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती.(उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती नजरकैदेत; काश्मीरमध्ये कलम 144 लागू)

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे राज्यात स्थिती अधिक बिघडू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता जम्मू-कश्मीर येथील परिस्थिती पूर्ववत होत आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे सुरक्षादलाच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.