Illegal Immigrants (फोटो सौजन्य - ट्विटर)

Illegal Immigrants: अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या भारतीयांची दुसरी खेप आज भारतात पोहोचणार आहे. विमान रात्री 10 च्या सुमारास अमृतसर (Amritsar) मध्ये उतरेल. अमेरिकेने या विमानातून 119 भारतीयांना परत पाठवले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसरे विमानही 16 फेब्रुवारी रोजी अमेरिकेहून येऊ शकते, ज्यामध्ये 157 लोक असतील. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये 59 जण हरियाणाचे, 52 जण पंजाबचे आणि 31 जण गुजरातचे आहेत. याशिवाय, उर्वरित लोक इतर राज्यांतील आहेत.

यापूर्वी, अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन येणारे पहिले विमान 5 फेब्रुवारी रोजी अमृतसरमध्ये उतरले होते, ज्यामध्ये अमेरिकेने 104 भारतीयांना परत पाठवण्यात आले होते. तथापी, आज अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांना घेऊन दुसरे विमान अमृतसरला येत आहे. यावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी केंद्र सरकारवर पंजाबची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. (वाचा - Illegal Indian Migrants in US: अमेरिकेतून 18,000 अवैध भारतीय स्थलांतरितांना परत पाठवले जाणार; सरकार करणार Donald Trump प्रशासनाला सहकार्य- Reports)

भगवंत मान यानी म्हटलं आहे की, अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांना फक्त अमृतसरमध्येच का उतरवले जात आहे? नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीनंतर ट्रम्पची भारतासाठी ही भेट आहे का? कोणत्याही भारतीयाला बेड्या घालून त्याच्या देशात परत पाठवू नये. लोक परदेशात जात आहेत, कारण त्यांना भारतात नोकऱ्या मिळत नाहीत. ते त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परदेशात जात आहेत. हे लोक देश सोडून जाऊ नयेत याची खात्री करणे ही भारत सरकारची जबाबदारी आहे. (हेही वाचा: Donald Trump Executive Orders: अमेरिका WHO मधून बाहेर, TikTok ला दिलासा, बिडेन प्रशासनाचे निर्णय रद्द; डोनाल्ड ट्रम्प यांची पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी)

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानावर काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे की, ही विमाने पंजाबमध्ये का उतरत आहेत? तुम्ही कोणत्या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात? अमेरिकेत येणारा प्रत्येक बेकायदेशीर स्थलांतरित हा पंजाबचा आहे, असा संदेश तुम्ही देण्याचा प्रयत्न करत आहात का? तुम्ही हे विमान दिल्लीत किंवा इतरत्र उतरवू शकला असता. दरवेळी अमृतसरमध्येच का?

विमान उतरवण्यासाठी अमृतसरची निवड कोणत्या आधारावर करण्यात आली, हे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट करावे. पंजाबला बदनाम करण्यासाठी तुम्ही अमृतसरची निवड करता. हे लोक पंजाबला लक्ष्य करू इच्छितात. अमेरिकेत गेलेले हे लोक गुन्हेगार आणि दहशतवादी नव्हते. ते सर्व आर्थिक फायद्याच्या शोधात आणि त्यांचे जीवन सुधारण्यासाठी गेले होते. ते बेकायदेशीरपणे गेले होते ही वेगळी बाब आहे, पण त्यांना अमेरिकन कायद्यानुसार परत पाठवले गेले का? असा सवालही मनीष तिवारी यांनी केला आहे.