देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने (SBI) राज्यात सण सुरु होण्यापूर्वी ग्राहकांना खुशखबर दिली आहे. एसबीआयने सोमवारी एमएसएमइ (MSME), हाउसिंग (Housing), ऑटो (Auto) आणि रिटेल लोन (Retail Loan) यांच्या बदलणाऱ्या दरासंबंधित एक्सटर्नल बेंचमार्कच्या रुपात रेपो रेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 ऑक्टोंबर पासून बदल लागू होणार असल्याने आता लोन स्वस्त होणार आहे. आरबीआयने 4 सप्टेंबर ला सर्व बँकांनी रिटेल लोन फ्लोटिंग रेट्स मध्ये बदलण्यात यावे असा आदेश दिला आहे.
एसबीआयने मीडियम एन्टरप्राइजच्या एक्सटर्नल बेंचमार्कच्या आधारावर लोनसाठी चालना देण्यात आली आहे. यामध्ये एसएसएमइ सेक्टरला सुद्धा अधिक चालना मिळणार आहे. SBI ने 1 जुलै रोजी फ्लोटिंग होम लोन सादर केले होते. मात्र या सुविधेत काही बदल केले असून येत्या 1 ऑक्टोंबर पासून नवी स्किम लागू करण्यात येणार आहे.
तर 2014 मध्ये एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लॅडिंग रेट आधारावर व्याज दर सुरु केला होता. मात्र अन्य बँकांनी सुद्धा मुळ रेट बाबत गणित सोडून MCLR चा वापर करण्यास सुरुवात केली. तसेच एसबीआयने रेपो-लिंक लॅडिंग रेट हा आरबीआयच्या रेपो रेटपेक्षा 2.25 टक्कांपेक्षा अधिक असतो. सध्या रेपो रेट 5.40 असून एसबीआयचा RLLR 7.65 टक्के आहे.(SBI ने सुरु केली DoorStep Banking ची सुविधा; आता घरबसल्या करा बँकेची कामे)
तर बँकेच्या मते 10 सप्टेंबर पासून एका वर्षापर्यंत एसबीआय एसएलआर 8.15 टक्के असणार आहे. आर्थिक वर्ष 2019-20 दरम्यान बँकेने तिसऱ्या वेळेस एमसीएसआरमध्ये कपात केली आहे. तसेच एसबीआयने फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात चतुर्थांश टक्के कपात केली आहे. एमसीएलआर म्हणजे मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लँडिंग रेट. MCLR कमी झाल्याने होम लोनवरील व्याजदर किंवा इएमआयवर कोणताही परिणाम होणार नाही आहे. एसबीआयच्या फ्लोटींग रेट होम लोन हे एका वर्षाच्या एमसीएलआर सोबत जोडला गेलेला असतो. त्यामुळे या एका वर्षासाठी निश्चित रेट ठरवण्यात येतो.