Representational Image (Photo Credits: PTI)

जर तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी पैसे भरत असाल तर थांबा. कारण एसबीआयकडून (SBI) नागरिकांनी आयटीआर भरण्याची सुविधा फ्री मध्ये देत आहे. याबद्दल बँकेने ट्विट करत म्हटले की, तुम्ही फक्त काही महत्वाच्या कागदपत्रांची पुर्तता करुन आयटीआर फाइल करु शकता. करदात्यांना आयटीआर फाइल करण्यासाठी येत्या 31 डिसेंबर पर्यंतची वेळ देऊ करण्यात आली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर नंतर आयटीआर फाइल केल्यास तुम्हाला त्यासाठी दंड भरावा लागणार आहे.(7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचारी, पेंशनर्स यांना DA, DR Arrears बाबत मिळू शकते गूड न्यूज; PM Narendra Modi लवकरच घेणार अंतिम निर्णय)

भारतीय स्टेट बँकेने ट्विट करत त्यात असे म्हटले की, तुम्हाला आटीआर फाइल करायचा आहे? तर तुम्ही YONO Tax2Win च्या मदतीने हे काम फ्री मध्ये करु शकता. या व्यतिरिक्त तुम्ही सीएची सुविधा मिळवू शकता. मात्र सीएच्या सुविधेसाठी तुम्हाला शुल्क मोजावे लागणार आहे. हे शुल्क 199 रुपयांपासून सुरु होणार असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे. जर तुम्हाला फ्री मध्ये आयटीआर भरायचा असेल तर https://sbiyono.sbi/index.html येथे भेट द्यावी. आयटीआर भरण्यासाठी या काही स्टेप्स फॉलो करा.

-सर्वात प्रथम YONO App वर लॉगइन करा

-त्यानंतर तुम्हाला शॉप अॅन्ड ऑडर येथे जावे

-आता टॅक्स अॅन्ड इन्वेस्टमेंट येथे भेट द्यावी

-तुम्हाला आता Tax2Win दिसेल

-येथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल

-माहिती मिळाल्यानंतर सोप्प्या पद्धतीने ITR भरता येईल

दरम्यान, आयटीआर भरण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, फॉर्म-16, व्याज उत्पन्नाचे प्रमाणपत्र, इंवेस्टमेंट प्रूफ फॉर टैक्स सेविंग्स आणि टॅक्स डिडक्शन डिटेल्सची गरज भासणार आहे. या काही महत्वाच्या कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्ही फ्री मध्ये आयटीआर एसबीआयच्या द्वारे भरु शकता.