भारतीय स्टेट बँकने फिक्स डिपॉझिटवर एका महिन्याभरात आतमध्ये पुन्हा एकदा व्याजदरात कपात केली आहे. बँकेने 45 दिवसांपर्यंत अवधी सारख्या शॉर्ट टर्म एफडीवरील व्याजदरात 0.50% ने कपात केली आहे. हे नवे दर 10 मार्च पासून लागू करण्यात आले आहेत. नव्या दरांच्या नुसार, 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळणार आहे. यापूर्वी 4.50 टक्के होते. तसेच 1 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी एडीवरील व्याजदरात 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे. यावर यापूर्वी 6 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येत होते.फेब्रुवारी महिन्यातच एफडीच्या दरात 10 ते 50 बीपीएसची कपात केली होती. बँकांनी 46 ते 179 दिवस, 180 ते 210 दिवस आणि 211 दिवस ते एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठीच्या एफडीवरील व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. बँकेने MCLR मध्ये सुद्धा 15 बीपीएसची कपात केली आहे.(SBI WhatsApp Fraud: ग्राहकांना सावधानतेचा इशारा! व्हॉट्सअॅप मेसेजद्वारा अनेक ग्राहकांची अकाऊंट्स धोक्यात)
दुसऱ्या बाजूला जेष्ठ नागरिकांसाठी एफडीवर कपात केल्यानंतर 46 दिवस ते 179 दिवसाच्या एफडीवर 5.50 टक्के व्याज मिळणार आहे. तर 180 ते 210 दिवसाच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना व्याजदर 6 टक्के असणार आहे. 211 दिवस ते 1 वर्षापर्यंतसाठी सुद्धा व्याजदर 6 टक्के ठेवण्यात आला आहे. तसेच जर तुम्ही एसबीआयचे कर्मचारी किंवा पेन्शनधारक असल्यास तुम्हाला एफडीमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर इंट्रेस्ट रेट पेक्षा 1 टक्के अधिक इंट्रेस्ट मिळणार आहे.
तसेच एसबीआयने 1 जानेवारी 2020 पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठीओटीपी अनिवार्य केला आहे. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत एटीएममधून पैसे काढल्यास तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यानंतरच ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी एसबीआयने हा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षापासून 10 हजार आणि त्यापेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात येणार आहे.