स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (State Bank Of India) त्यांच्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपद्वारा पसरवल्या जाणार्या चूकीच्या मेसेज बाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. ट्विटरवर(Twitter) याबाबतचं वॉर्निंग ट्विट केले आहे. आजकाल सोशल मीडियामध्ये फेक न्यूज (Fake News) पसरवल्या जातात. एसबीआयने वॉर्निंग एका ट्विटच्या माध्यमातून दिले आहे.
SBI चं वॉर्निंग ट्विट
Stay alert to stay safe! Fake offers on messages via WhatsApp and social media could lead you astray. Report any untoward incident by calling at 1-800-111109.#Safety #Alert pic.twitter.com/vGGdXZlCVJ
— State Bank of India (@TheOfficialSBI) March 9, 2019
बॅंकिगचे काही मेसेज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले असतील तर त्याची बॅंकेमध्ये खात्री करून घ्या. तसेच फेक मेसेज किंवा कॉल्स यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षित राहण्यासाठी अलर्ट रहा. व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडीयाच्या माध्यमातून मेसेज करून फेक ऑफर्सकडे आकर्षित होऊ नका. कोणत्याही चूकीच्या माहितीची तक्रार करण्यासाठी 180011109 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधणं गरजेचे आहे.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोणीही अकाऊंट युजर टू फॅक्टर ऑथंटिकेशन व्हॅलिडेशन शिवाय थेट वापरू शकत नाही. कोणालाही क्रेडिट अकाऊंट, बॅकेची माहिती, ओटीपी क्रमांक थेट देऊ नका. ऑफर्सची माहिती घेताना तुम्हांला त्याची व्हॅलिडीटी तपासून पाहणंदेखील गरजेचे आहे.
काही कस्टमर्सना सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज मिळतात. त्यामध्ये ओटीपी विचारला जात आहे. याद्वारा लहान स्वरूपात ट्रान्झॅक्शन केली जातात. पण जर तुम्ही ओटीपी देताय म्हणजे तुमचं नेट बॅंकिंग धोक्यात आलंय असा समजा. याद्वारा फ्रॉड्स होण्याची शक्यता असते.