SBI Changes Rule: देशातील सर्वाधिक मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या 1 फेब्रुवारी पासून IMPS ची लिमिट वाढवण्यात येणार आहे. तर ही सुविधा एका नव्या स्लॅबअंतर्गत जोडण्यात आली आहे. त्यानुसार 2-5 लाखापर्यंतच्या स्लॅबचा यामध्ये समावेश आहे. या मर्यादेतील रक्कम पाठवण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये अधिक जीएसटी शुल्क द्यावा लागणार आहे. आयएमपीएस बँकेकडून दिली जाणारी अशी सुविधा आहे जी रियल टाइम मध्ये इंटर बँक फंड ट्रान्सफर करता येतात. तसेच ही सुविधा 24X7 तास उपलब्ध असते.
आयएमपीएस म्हणजे इमीडेट मोबाइल पेमेंट सर्विस आहे. ज्याच्या माध्यमातून खातेधारकांना कधीही आणि कोठेही अवघ्या काही मिनिटांमध्ये पैसे पाठवता येतात. या सुविधेसाठी कोणतेही नियम आणि सुट्ट्यांचा यामध्ये समावेश नाही आहे.भारतात ऑनलाइन बँकिंगचे आणखी काही माध्यमे सुद्धा आहेत. त्याच्या माध्यमातून एखाद्याला पैसे पाठवता येतात. त्यामध्ये IMPS, NEFT आणि RTGS चा समावेश आहे. (Budget Session 2022: 'या' कारणामुळे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीला शून्य तास होणार नाही, जाणून घ्या काय आहे प्रकरण)
आरबीआयचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी ऑक्टोंबर महिन्यात आयएमपीएस सर्विस संबंधित मोठी घोषणा केली होती. त्यानुसार आता ग्राहकांना 5 लाखांपर्यंत ट्रांजेक्शन करता येणार आहे. यापूर्वी याची मर्यादा 2 लाखांपर्यंतच होती.
एसबीआयने नव्या वर्षात ग्राहकांसठी एक खास ऑफर आणली आहे. त्यानुसार अधिक व्याज पर्सनल कर्जावर द्यावे लागते, त्यासाठी एसबीआयने आपल्या ग्राहकांना प्री-अप्रुव्ह पर्सनल लोनची ऑफर आणली आहे. ही सुविधा अॅपच्या माध्यमातून सुद्धा वापरता येणार आहे. तसेच पर्सनल लोनवर विशेष सूट सुद्धा दिली गेली आहे.