SBI Admit Card 2020: एसबीआय क्लर्क परिक्षा 8 मार्च रोजी, sbi.co.in वर अ‍ॅडमिट कार्ड असे पहा
Representational Image (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या क्लर्क पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी आता अॅडमिट कार्ड जाहिर करण्यात आले आहे. उमेदवारांना अॅडमिट कार्ड www.sbi.co.in/careers येथे झळकवले आहे. त्यामुळे उमेदवारांना येथून त्यांचे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे. बँकेने एक नोटिस जाहिर करत क्लर्क पदासाठी परिक्षेला सुरुवात 22 फेब्रुवारी, 29 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 8 मार्चला आयोजित करण्यात आली आहे. एसबीआय क्लर्क परिक्षा 2020 साठी 8134 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

परिक्षेसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी शेवटचा दिवस 26 जानेवारी आहे. SBI ची पूर्व परिक्षा आणि मुख्य परिक्षेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. त्यामुळेच अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यापूर्वी तुमचे लॉगिल बाबतची माहिती तयार ठेवा. अॅडमिट कार्डवरील अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे नाव आणि अन्य खासगी माहितीस परिक्षा केंद्र, पत्ता, तारिख यांची माहिती देण्यात येणार आहे.(खुशखबर! आता रेल्वे स्टेशनवर Health ATM ची सोय; अवघ्या 60 रुपयांमध्ये करा 16 आरोग्य तपासण्या)

SBI क्लर्क परिक्षेसाठी अॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे कराल?

-SBI च्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co वर भेट द्या.

-होमपेजवर गेल्यावर करियर लिंक येथे क्लिक करा.

-तेथे SBI Clerk परिक्षा लिंकवर जावे.

-आयडी आणि पासवर्ड संदर्भातील संपूर्ण माहिती द्या.

-त्यानंतर तुमच्या समोर अॅडमिट पान सुरु होईल.

-अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहे.

उमेदवारांना त्यांच्या सोबत पासपोर्ट/आधार कार्ड/पॅन कार्ड/वाहन परवाना/मतदान कार्ड/बँक पासबुक या गोष्टींमधील एक किंवा शाळा/महाविद्यालयाचे प्रमाणपत्र आणि एक फोटो घेऊन येणे महत्वाचे आहे. परिक्षेत 190 प्रश्न असणार असून उमेदवारांना पेपर सोडवण्यासाठी 2 तास 40 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.