
ग्रामपंचायत हद्दीतील जमीनीवर बेकायदा कब्जा मिळवल्या प्रकरणी सरपंच पत्नीने (Sarpanch Wife) आपल्या पतीलाच कायद्याचा हिसका दाखवला आहे. सरपंच पत्नीने थेट कायदेशीर नोटीस काढत आपल्या पतीला जमीनीवरचा ताबा सोडण्यास व आपल्यावर कायदेशीर कारवाई का करुन नये याबाबत कारणे दाखवा नोटीस( Show Cause Notice) बजावली आहे. गुजरात (Gujarat) राज्यातील बनासकांठा (Banaskantha) येथील वडगाम (Vadgam) तालुक्यात असलेल्या थालवडा गावच्या सरपंच अनु चौधरी (वय 35 वर्षे) यांनी ही नोटीस पती दिनेश चौधरी (वय 40 वर्षे) यांना पाठवली आहे.
दिनश चौधरी यांच्यावर गावातील गायरान जमीनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. अनु चौधरी यांनी 2017 मध्ये सरपंच पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. अनु यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, दिनेश चौधरी यांना बजावण्यात आलेली नोटीस ही आलेल्या तक्रारीवरुनच करण्यात आली आहे. दिनेश यांना डिसेंबर 2017 मध्येच चौधरी यांना नोटीस बजवावण्यात आली होती. मात्र, नोटीस मिळूनही आरोपीने (चौधरी) गावातील गायरानमध्ये अतिक्रमण केलेली जमीन खाली केली नाही. दिनश चौधरी याने गायरानमधील सुमारे 810 चौरस मीटर परिसरातील जमीन खाली केली नाही. त्यामुळे 12 जानेवारी 2019 या दिवशी त्याला दुसऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली. (हेही वाचा, धक्कादायक! बिजनोर येथे महिलेला बाजेला बांधून जाळले; पीडितेवर बलात्कार झाल्याचा उत्तर प्रदेश पोलीसांना संशय)
वडगाम गावच्या तलाटी वर्षा चौधरी यांनी सांगितले की, सरपंचांनी जिल्हा प्रशासनासही माहिती दिली होती.अधिक मागिती देताना वर्षा चौधरी यांनी सांगितले की, सरपंच अनु चौधरी यांना गावच्या गायरानात सुमारे 7 ते 8 एकर जमीनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार मिळाली होती. त्यानुसार त्यांनी नोटीस पाठवली आहे.