Mulayam Singh Yadav | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) संस्थापक मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांची प्रकृती गंभीर आहे. गुरुग्राममधील (Gurugram) मेदांता हॉस्पिटलच्या (Medanta Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) मध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मुलायम सिंह यादव 22 ऑगस्टपासून मेदांता रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुलायम यादव हे सध्या 82 वर्षांचे आहेत. सोमवारपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयाच्या क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरु होते. मुलायम यादव यांच्या प्रकृतीबाबत मेदांता हॉस्पिटलने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये आणि समाजवादी पक्षाने त्यांच्या अधिकृत हँडलवर ट्विट करुन माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मुलायम सिंह यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. ते मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे.

समाजवादी पक्षाने आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही सर्वजण त्यांच्या (मुलायमसिंग यादव) लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहोत,” असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे. (हेही वाचा, Mulayam Singh Yadav: समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावली, गुरुग्राममधील अतिदक्षता विभागात दाखल)

ट्विट

मुलायम सिंह यादव हे एक कसलेले भारतीय राजकारणी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक-आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून सलग तीन वेळा काम केले आहे. शिवाय संसदीय राजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. ते काही काळ संरक्षणमंत्री देखील राहिले आहेत. मुलायम सिंह यादव हे सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. या आधी त्यांनी आझमगढ आणि संभल मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांना नेताजी ( हिंदीत आदरणीय नेता) असे संबोधतात