#Salute2Soldiers: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला केले आवाहन; म्हणाले - 'या दिवाळीत सैनिकांच्या स्मरणार्थ प्रज्वलित करूया दिवे'
File image of Prime Minister Narendra Modi (Photo Credits: PIB)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी शुक्रवारी देशातील जनतेला आवाहन करत सांगितले की, ही दिवाळी (Diwali 2020) सैनिकांच्या सन्मानार्थ साजरी करण्यात यावी. पीएम मोदी यांनी ट्विट केले आहे की, या दिवाळीत, सैनिकांच्या सन्मानार्थ दीप प्रज्वलित करूया. सैनिक धैर्याने आमच्या सीमांचे रक्षण करतात. सैनिकांच्या धैर्याचा आदर शब्दांत व्यक्त करता येत शक्य नाही. आम्ही सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या कुटूंबियांबद्दल कृतज्ञ आहोत. मला माझ्या शूर सैनिकांना सांगायचे आहे की तुम्ही सीमेवर असलात तरी संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे.'

ते पुढे म्हणाले, ‘देश आपल्यासाठी शुभेच्छा देत आहे. ज्या कुटुंबातील मुले व मुली सीमेवर आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदानास मी सलाम करतो. प्रत्येक व्यक्ती जो देशाशी संबंधित काही जबाबदाऱ्यांमुळे आपल्या घरी नाही, मी मनापासून त्याचे आभार मानतो.’

पंतप्रधानांनी गेल्या महिन्यात आपल्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमातही देशवासियांना हे आवाहन केले होते. पीएम मोदी आपल्या भाषणात म्हणाले होते की, या दिवाळीत, सीमेवर उभे राहून भारतमातेची सेवा आणि संरक्षण करणाऱ्या शूर सैनिकांची आठवण काढूया. पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर भाजपनेही जनतेला आवाहन केले होते की, त्यांनी सैनिकांना सन्मानार्थ दीप प्रज्वलित करतानाचा आपला फोटो सोशल मीडियावर शेअर करावा. (हेही वाचा: दिव्यांच्या आकर्षक रोषणाईने सजली अयोध्या नगरी; दिवाळीनिमित्त शरयू काठी 5.51 लाख दिवे प्रज्वलित करून स्थापित होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड)

दरम्यान, पंतप्रधान जनतेला हे आवाहन करत असतानाचा, जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील शेजारील देशाकडून युद्धबंदीच्या उल्लंघनाचा भंग झाल्यानंतर देशाचे तीन सैनिक आणि तीन नागरिक शहीद झाले आहेत. त्याशिवाय शेजारच्या देशाने केलेल्या या भ्याड कृत्यानंतर नऊ सैनिक गंभीर जखमी झाले आहेत.