भारतामध्ये सध्या कोविड 19 ची दुसरी लाट प्रत्येक दिवशी आपलं विदारक रूप दाखवत आहे. मागील काही दिवस सातत्याने 24 तासांमध्ये 3 लाखाहून अधिक रूग्ण वाढत आहेत. मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या देखील चिंताजनक असताना भारत देश एकत्र येत या संकटाशी सामना करत आहे. सोशल मीडियातही आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स आणि अन्य कोविड उपचारांसाठी मदत मागणारी हतबल पोस्ट शेअर केली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशापरदेशातून ही स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अशापैकी एक म्हणजे ‘Mission Oxygen’. सध्या मिशन ऑक्सिजन कडून फंड्स गोळा कडून Oxygen Concentrators हॉस्पिटलला दान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनेही (Sachin Tendulkar) हातभार लावला आहे. मीडीया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार सचिन तेंडुलकरने 1 कोटींची मदत केली आहे. तर इतरांनाही यामध्ये हातभार लावण्याचे आवाहन केले आहे. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्स, सेलिब्रिटींकडूनही सध्या या उपक्रमात सहभागी होत आर्थिक मदत करण्याचं आवाहन केले जात आहे.
मिशन ऑक्सिजन ही दिल्ली-एनसीआर बेस्ड उद्योजकांची निधी उभारणीस पुढाकार घेणारा उपक्रम आहे. यामधून जमा केलेले पैसे वापरून परदेशातून ऑक्सिजन ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर्स मशिन घेतल्या जातात आणि हॉस्पिटलला त्या मदत म्हणून दिल्या जातात. Prone Position Breathing म्हणजे काय? गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल?
सचिन तेंडुलकरची पोस्ट
— Sachin Tendulkar (@sachin_rt) April 29, 2021
काही दिवसांपूर्वीच कोविड वर मात करून बाहेर पडलेल्या सचिन तेंडुलकरने त्याच्या 48 व्या वाढदिवसाचं औचित्य साधत कोरोना तून बर्या झालेल्या लोकांना परवानगी असल्यास प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन केले आहे. स्वतः सचिन देखील येत्या काही दिवसांत प्लाझ्मा दान करणार आहे. मागील वर्षी मुंबईत त्याच्याच हस्ते प्लाझ्मा सेंटरचं उद्घाटन देखील करण्यात आलं आहे.
आज आयपीएल च्या फ्रायचांसी मधील एक राजस्थान रॉयल ने 7.5 कोटीचे दान केले आहे. काही परदेशी क्रिकेटर्सनी देखील मागील काही दिवसांत भारताच्या कोविड 19 विरूद्धच्या लढाईमध्ये आर्थिक मदत केली आहे.