Sachin Pilot Hunger Strike: सचिन पायलट यांच्या लाक्षणिक उपोषणाला सुरुवात, उपोषणाला पक्षविरोधी कृती ठरवले
Sachin Pilot (Image Credit - ANI Twitter Video)

राजस्थानातील (Rajasthan) विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आहे याआधी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehalot) यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. जयपूरमधील शहीद स्मारक येथे राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी राज्यातील मागील भाजप सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचारावर कारवाईची मागणी करत दिवसभराचे उपोषण सुरू केले आहे. यावरून राजस्थान काँग्रेसचे प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा (Sukhjinder Singh Randhawa) यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, पालयट यांचे उपोषण पक्षविरोधी कृती आहे, असे रंधावा यांनी म्हटलं.

पहा व्हिडिओ -

सचिन पायलट यांच्या उपोषणाविरोधात रंधावा यांनी निवेदन जारी करत सांगितले, “सचिन पायलट यांचे उपोषण पक्षविरोधी कृती आहे. जर, त्यांना आपल्या सरकारच्या कामाबद्दल काही अडचण होती, तर माध्यमांत जाण्याऐवजी पक्षीय बैठकीत मुद्दा मांडायला हवा होता. गेल्या पाच महिन्यांपासून मी राजस्थानचा प्रभारी आहे. मात्र, पायलट यांनी कधी या समस्यांवर चर्चा केली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.  याप्रकरणी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यानंतरही कारवाई नाही झाली, तर पालयट यांना उपोषण करण्याचा अधिकार होता. परंतु, पक्षीय स्तरावर चर्चा न करता, थेट उपोषणाला बसणे योग्य नाही,” असेही रंधावा यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवण्यात आल्यापासून सचिन पायलट यांनी त्यांच्या बद्दलची नाराजगी अनेकदा बोलून दाखवली आहे. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री पदी विराजमान हाोता न आल्याने त्यांनी अनेकदा आपली नाराजगी व्यक्त केली आहे.