ATM Machine | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Money Control.com)

देशात सध्या ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करता येण्यासाठी विविध अॅप, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करण्यात येतो. मात्र आता येत्या 16 मार्च नंतर देशभरात एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यात येणार आहे. आरबीआयच्या मते, डेबिट कार्ट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार अधिक सोपे होण्यासाठी नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. त्याचसोबत खात्यामधील रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा हे नियम उपयोगी ठरणार आहेत.यापूर्वी 1 जानेवरी 2020 मध्ये एसबीआयने एटीएमच्या माध्यमातून पैसे काढण्यासाठी नवे नियम लागू केले. त्यानंतर एसबीआयने ओटीपीच्या आधारे पैसे काढण्याची सेवा सुरु केली आहे. त्याअंतर्गत रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंतच्या दरम्यान पैसे काढायचे झाल्यास तुम्हाला रजिस्टर मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी द्यावा लागणार आहे. हा नियम 10 हजारापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी लागू होणार आहे.

आरबीआयने बँकांना सांगितले की, कार्ड देताना देशातील एटीएम आणि पीओएस टर्मिनल्सवर फक्त डॉमेस्टिक कार्डच्या माध्यमातून ट्रान्जेक्शनला मंजूरी दिली आहे. म्हणजेच आता ज्या लोकांचे परदेशात येणे-जाणे होत नाही आणि त्यांच्या बँकेच्या कार्डवर ओव्हरसीज सुविधा मिळणार नाही आहे. पण बँकेला त्यासदंर्भात अर्ज केल्यास ती सुविधा सुरु करण्यात येणार आहे.ग्राहकांना परदेशात ट्रान्जॅक्शनस, ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करण्याची सेवा हवी असल्यास त्यांनी ती वेगळ्या कार्डच्या माध्यमातून घ्यावी असे सांगण्यात आले आहे. (LPG Price Hike: घरगुती गॅस सिलेंडरच्या विना अनुदानित किंमतीत मोठी वाढ; आज पासून मुंबई, दिल्ली, कोलकता येथे लागु झालेले नवे दर जाणुन घ्या)

बँकांना त्यांच्या ग्राहकांसाठी पीओएस/एटीएम/ऑनलाईन ट्रान्जॅक्शनसाठी देशात आणि परदेशात बदल करण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. तसेच कार्ड स्विच ऑन किंवा ऑफ करण्याची सुविधा सुद्धा द्यावी लागणार आहे.  ग्राहकांना कधीही कार्ड ऑन किंवा ऑफ करावे लागणार आहे. तसेच व्यवहारांच्या लिमिटवर सुद्धा बदल करता येणार आहेत. यासाठी मोबाईल अॅप किंवा इंटरनेट बँकिंच्या मदतीने आयवीआरच्या आधारे ते करता येणार आहे.