Retired SC Justice Markandey Katju On UK Court: सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू इंग्लंडच्या कोर्टात मांडणार नीरव मोदी याची बाजू
Retired Supreme Court Judge Markandey Katju | (Photo Credits: Facebook)

पीएनबी बँक (PNB Bank) आर्थिक घोटाळा प्रकरणात आरोपी असलेला आणि सध्या भारताबाहेर पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) याच्या विरोधात इंग्लंडमधील न्यायालयात (UK Court) खटला सुरु आहे. नीरव मोदी यांचे भारताकडे प्रत्यार्पण व्हावे यासाठी भारत सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर या खटल्यांतर्गत सुनावणी होत आहे. दरम्यान, प्रकरणात भारत सरकारच्या याचिकेच्या विरुद्ध आणि नीरव मोदी याच्या बाजूने चक्क भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काउन्सील ऑफ इंडिया चे माजी चेअरमन मार्केंडेय काटजू (Markandey Katju) उतरणार असल्याचे वृत्त आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. काटजू यांच्या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काडजू यांनी स्वत:ही याबाबत पुष्टी केल्याचा दावा इकॉनॉमिक टाईम्सने आपल्या वृत्तात केला आहे. न्यायमूर्ती काटजू यांनी म्हटले आहे की, उद्या मी इंग्लंडच्या कोर्टात नीरव मोदी यांच्यासाठी एक साक्षीदार म्हणून व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून सादर होणार आहे. परंतू, मी खटल्याच्या मेरीटवर कोणतीही टिप्पणी करणार नाही. मी फक्त इतकेच म्हणेन की, त्यांना (नीरव मोदी) भारतात न्याय मिळू शकत नाही. (हेही वाचा, Lockdown करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेण्यात आला, त्यावर पुनर्विचार व्हावा- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश)

काटजू यांनी नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारताच्या याचिकेविरद्ध आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लडचे एका न्यायालये हिरे व्यापारी निरव मोदी याच्या प्रत्यार्पणाबाबत भारताने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत आहे.  (हेही वाचा, Nirav Modi Extradition Case: नीरव मोदी याचे चांगले दिवस संपले? भारतात प्रत्यार्पणासाठी लंडन मधील कोर्टाकडून कारवाईला सुरुवात)

न्यायमूर्ती काटजू यांनी म्हटले आहे की, नीरव मोदी याला भारतात स्वतंत्र आणि निष्पक्ष ट्रायल मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण भारतीय प्रसारमाध्यमं आणि काही संस्थांनी नीरव मोदी यांना आगोदरच दोषी ठरवून टाकले आहे.