Remdesivir इंजक्शनचा भारतभर तुटवडा; औषध दुकानांबाहेर देशभर रांगाच रांगा
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: PTI)

केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी प्रामुख्याने रेमडेसिविर इंजेक्शन (Remdesivir Injection) वापरले जाते. या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनसाठी औषधांच्या दुकानांबाहेर रांगाच्या रांगा लागताना दिसत आहेत. केवळ एकट्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात असेच चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोना रुग्णांसाठी प्रामुख्याने गंभीर स्थितीत असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्लाने रेमडेसिविर इंजेक्शन दिले जाते. हे औषध अशा रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, नेमका याच औषधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.. त्यमुळे केंद्र सरकारने हे औषधक निर्माण करणाऱ्या उत्पादकांना त्याचे उत्पादन पूर्ण क्षमतेने वाढवण्याचे आदेश दिले. विशिष्ट ठिकाणी ड्रगची कमतरता असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, Remdesivir Injection चा उत्तर प्रदेशमध्ये साठेबाई आणि काळाबाजार होत आहे. ज्या इंजेक्शनची मूळ किंमत 900 ते 1800 इतकी आहे तेच इंजेक्शन जवळपास 5000 रुपयांना विकले जात आहे.