RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी दिला राजीनामा
विरल आचार्य (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारतीय रिजर्व्ह बँक (RBI) मधील डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य (Viral Acharya) यांनी कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला आहे. तर आचार्य यांचा कार्यकाल पूर्ण होण्यासाठी 6 महिने बाकी होते. तीन वर्षांसाठी आचार्य यांना डेप्युटी गव्हर्नर पदाचा कारभार 23 जानेवारी 2017 रोजी सोपण्यात आला होता. तर 2020 मध्ये त्यांचा कार्यकाल पूर्ण होणार होता.

परंतु 6 जूनला आयोजित केलेल्या आरबीआयच्या अंतिम बैठकीपूर्वी काही आठवड्यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. विरल आचार्य यांनी याबद्दल खुद्द पुष्टी केली असून काही व्यक्तीगत कारणासाठी पदाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार RBI च्या अजून एका डेप्युटी गव्हर्नर एनएस विश्वनाथन यांचा कार्यकाल जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. त्यांची एक किंवा दोन वर्षांसाठी पुन्हा त्याच पदावर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचसोबत विश्वनाथन यांच्या जागेवर करण्यात येणारी नियुक्ती थांबण्यात आली आहे.(RBI Governor उर्जित पटेल यांचा राजीनामा)

यापूर्वी 7 महिन्यांआधी आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी काही कारणास्तव डिसेंबर महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिल्याने आरबीआयला दुसरा मोठा धक्का बसला आहे.