भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर (फोटो सौजन्य-ट्वीटर)

दिल्ली  (Delhi) मधील तुगलकाबाद जवळ असलेल्या रवि दास मंदिर (Ravi Das Mandir) तोडफोड प्रकरणी भीम आर्मी (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर (Chandrashekhar) यांच्यासह 96 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण बुधवारी रात्री पासूनच तापले असून येथील शेकडो गाड्यांची तोड फोड करण्यात आली. या प्रकरणी 15 पोलिससुद्धा जखमी झाले आहेत.

रवि दास मंदिर पाडल्यानंतर दलित समाजातील कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर उर्फ रावण याचा सुद्धा सहभाग आहे. मात्र शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनासाठी पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून दलित समाजातील लोक जमले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी डीडीए तर्फे मंदिर तोडण्यात आले होते. तसेच रवि दास मंदिर विरुद्ध डीडीए यांच्यामध्ये या प्रकरणावरुन सुनावणी झाली होती. यामध्ये डीडीए यांचा विजय झाला होता. त्यानंतरच हे मंदिर पाडण्यात आले होते. मात्र दलित समाजातील लोकांनी मंदिर तोडल्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर बुधवार पासून दिल्ली मधील रामलीला मैदानात आंदोलन करण्यास सुरुवात केली.