Rape And Murder On Minor Girl: सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, 17 वर्षीय मुलास अटक
Rape And Murder (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

असम (Assam) राज्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बारपेटा जिल्ह्यातील या घटनेत एका 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर 6 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आणि नंतर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारपेटा (Barpeta District) जिल्ह्यातील बागबर मोरीपम (Baghbar Moram) येथे 29 जानेवारी रोजी अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली होती. तसेच, याच गावातील एका घरात एका पोत्यात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बारपेटा जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीची बालसुधारगृहात रवानगी

बारपेटा जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मामोनी हजारिका यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, आरोपी अल्पवयीन आहे. त्याला पोलिसांनी कारवाईक करुन तातडीने अटक केले. त्याला स्थानिक न्यायायात आम्ही हजर केले. न्यायालयाने त्याला बालसुधारगृहात पाठवले आहे. दरम्यान, हत्या झालेलेली पीडित मुलगीही अल्पवयीन आहे. हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे पुढे आले आहे. आम्ही आरोपीने हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त केल्याचे ते म्हणाले. (हेही वाचा, Pune: मैत्रिणीशी बोलतो! शालेय विद्यार्थ्यावर अल्पवयीन मुलाचा कोयत्याने हल्ला)

पीडिता अंगणामध्ये खेळताना अचानक गायब

पोलिस अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला होता. पालकांनी तक्रारीत म्हटले होते की, 26 जानेवारी रोजी त्यांची मुलगी घराबाहेर अंगणामध्ये खेळत होती. खेळताना ती अचानक बेपत्ता झाली. आम्हाला तक्रार प्राप्त होताच आमच्या गुप्तचरांनी शोध मोहीम सुरू केली आणि 29 जानेवारी रोजी आरोपीच्या घराच्या आवारात एका गोणीत अल्पवयीन मृतावस्थेत आढळून आली. (हेही वाचा, Schoolboy Attack Classmate: शाळेतील भांडणातून वर्गमित्रावर हल्ला; इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलास कंपासने 108 वेळा भोसकले)

आरोपीविरोधात आयपीसी कलम 302 आणि 210 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 6 अंतर्गत बागबार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. लहान मुलांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी चिंतेचा विषय आहे. अशीच एक घटना नुकतीच मुंबई येथेही घडली आहे. मुंबई येथील एका सहा वर्षाच्या मुलावर 14 वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार

दरम्यान, साकीनाका पोलिसांनी आणखी एका प्रकरणात वेगळ्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. तो मुलगाही 14 वर्षांचाच आहे. त्याच्यावर सहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही मुले एकाच वस्तीत राहतात.

लहान मुलाने त्याच्या पालकांना आपल्या त्रासाची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर बालकल्याण आयोगाकडे अहवाल पाठवला जाणार आहे. लहान मुलांमधील गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत आहे. लहान मुलांमध्ये वाढत असलेला स्क्रीन टाईम, त्यातून निर्माण होणारा ताण, सहज उपलब्ध असणारी शस्त्रे, आहार, झोप आणि मार्गदर्शन अशा विविध कारणांमुळे मुलांमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.