PM Narendra Modi Greets on Ram Navami 2021 (Photo Credits: Wikimedia Commons/PIB)

चैत्र महिन्यातील शुल्क नवमी म्हणजे राम नवमी (Ram Navami). या दिवशी दुपारी बारा वाजता प्रभू राम यांनी जन्म घेतला. राम नवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध राम मंदिरांमध्ये श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गातात, कीर्तन करतात. पालखी निघते. हा सोहळा रामभक्तांसाठी अगदी खास असतो. परंतु, यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे रामनवमीचा उत्सवावर पाणी फिरले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांच्यासह अन्य मान्यवरांनी ट्विटच्या माध्यमातून रामजन्माच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (श्रीराम नवमी निमित्त मराठमोळे Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून रामभक्तांना द्या खास शुभेच्छा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी:

तसंच कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी खास संदेश दिला आहे. त्यात ते म्हणतात, "आज रामनवमी आहे आणि मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आपल्या सगळ्यांना एकच संदेश आहे तो म्हणजे- मर्यादांचे पालन करा. कोरोना संकटकाळात सुरक्षित राहण्यासाठी कृपया सर्व नियमांचे पालन करा. 'दवाई भी, कडाई भी' हा मंत्र लक्षात ठेवा."

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह:

 

राहुल गांधी:

प्रकाश जावडेकर:

 

यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील जनतेला रामनवमी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात ते म्हणतात, "रामनवमीच्या या पवित्र दिनी मी देशातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. प्रभु राम यांचा जन्मदिवस अगदी उत्साहात साजरा केला जातो. न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करीत असताना आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांचे मोठे पाठबळ लाभते. भगवान श्री राम यांनी आपल्याला सद्गुण जीवन कसे जगावे हे शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन आणि नीतिमत्ता, सत्यता, संयम या त्यांच्या शिकवणी आपल्याला प्रेरणा देतात. या निमित्ताने आपण भगवान राम यांचे आदर्श आपल्या जीवनात आणण्यासाठी आणि एक गौरवशाली भारत घडविण्याच्या दृष्टीने एकत्रितपणे प्रयत्न करूया."