Ram Mandir Bhumi Pujan:  लालकृष्ण आडवाणी  यांची राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाबाबत भावनिक प्रतिक्रिया म्हणाले..
LK Advani | (Photo Credit: ANI)

ज्येष्ठ भाजप ( BJP) नेते आणि 1990 मध्ये निघालेल्या राम रथ यात्रा (Ram Rath Yatra) तसेच, राम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी (LK Advani ) यांनी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजन (Ram Mandir Bhumi Pujan) कार्यक्रमाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या हृदयातील एक मोठे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे, अशी प्रतिक्रिया आडवाणी यांनी दिली आहे.

लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, जीवनातील काही स्वप्न पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागतो. आज माज्या हृदयाच्या जवळचे एक स्वप्न पूर्ण होत आहे. अयोध्येत पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा केवळ माझ्यासाठीच नव्हे तर, संपूर्ण भारतीयांसाठी अत्यंत ऐतिहासिक आणि भावनिक क्षण आहे. (हेही वाचा, Ram Mandir Bhumi Pujan Schedule: अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची नेमकी वेळ काय? जाणून घ्या कार्यक्रमाची रुपरेषा)

राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला लालकृष्ण आडवाणी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. लालकृष्ण आडवाणी हे राम मंदिर आंदोलनातले प्रमुख नेते राहिले आहेत. बाबरी मशीद पाडल्याचा त्यांच्यावर आणि त्यांच्या अनेक तत्कालीन सहकाऱ्यांवर आरोप आहे. याबाबतचा खटला न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, राम मंदिर कार्यक्रमावर आडवाणी काय बोलणार याबाबत उत्सुकता होती.