अयोध्या (Ayodhya) येथील राम मंदिराचे (Ram Temple) भूमिपूजन (Bhumi Pujan) उद्या बुधवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. शिलान्यास झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. उद्या सकाळी 8 वाजता भूमिपूजनाचा सोहळा सुरु होणार असून दुपारी 2 पर्यंत हा कार्यक्रम चालेल. भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम दुपारी 12.30 ला सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. राम मंदिराचे शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दुपारी 12.40 ला पार पडेल. मंदिराचे पुजारी भूमिपूजनाची पूजा सांगतील. (पहा- राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज!)
या सोहळ्याचे लाईव्ह प्रेक्षपण DD National आणि DD न्यूज चॅनलवर पाहता येईल. विशेष म्हणजे अयोध्या येथील राम मंदिर सोहळ्याचे प्रक्षेपण DD News Live आणि DD India Live वर 5 ऑगस्टला सकाळी 6 वाजल्यापासून सुरु होणार आहे. अयोध्या येथील सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण DD National वर हनुमानगढ़ी आणि राम मंदिर येथून होणार आहे. दरम्यान आज 4 ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दीपोत्सवाच्या माध्यमातून सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. (5 ऑगस्ट ला अयोध्येत होणार्या राम जन्मभुमी मंदिराचे भूमीपूजन कुठे पाहता येणार लाईव्ह?)
पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. तर भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे चेअरमन महंत नृत्य गोपाल दास उपस्थित असतील. दरम्यान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारकडून मंदिराच्या बांधकामासाठी करण्यात आली आहे.