पाक नागरिक सीमा हैदरने (Seema Haider) आज (22 ऑगस्ट) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना राखी पाठवली आहे. पुढील आठवड्यात बहिण-भावाच्या जिव्हाळ्याचा राखी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाने मोदींसह केंद्रीय मंत्री अमित शाह, RSS chief Mohan Bhagwat आणि अन्य नेत्यांना राखी पाठवली आहे.
भारतामध्ये व्हिसा विना अवैध मार्गाने नेपाळ मार्गे सीमा भारतामध्ये आली आहे. भारतीय तरूणावर प्रेम जडलं आणि त्यामधून ती नेपाळ मध्ये 'सचिन' नामक भारतीय मुलासोबत लग्न करून आल्याचा तिचा दावा आहे. यंदा नारळी पौर्णिमेला म्हणजे 30 ऑगस्ट दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जाणार आहे. बहिण-भावाच्या प्रेमाचं बंधन म्हणून राखी बहिण भावाच्या हातावर बांधते आणि त्याच्याकडून तिचं रक्षण व्हावं अशी कामना व्यक्त करते. नक्की वाचा: Raksha Bandhan 2023: कमर मोहसीन शेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बांधणार हाताने बनवलेली राखी .
सोशल मीडीयामध्ये सीमाचा आज एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्यात ती देशाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा नेत्यांना वेळीच राखी मिळावी मी लवकर राखी पाठवत आहे. जय श्री राम, हिंदुस्तान झिंदाबाद जय हिंद असा ती नारा देताना ती दिसत आहे. व्हिडिओ मध्ये 'भैय्या मेरा राखी के बंधन को निभाना..' गाणं सुरू असताना मुलं राखींचं पॅकिंग करताना दिसत आहेत.
सचिन आणि सीमा यांच्या लव्ह स्टोरीची मागील काही दिवसांत खूप चर्चा रंगली आहे. नेपाळ मार्गे सीमा सचिन मीना साठी भारतामध्ये आली आहे. ग्रेटर नोएडा भागात ती राहत आहे. तिच्यासोबत तिची 7 पेक्षा कमी वयाची 4 मुलं देखील आहेत. 2019-20 मध्ये सचिन आणि सीमा यांच्यात PUBG खेळता खेळता प्रेम जडलं आणि त्यामधून मैत्री, लग्न असा त्यांचा प्रवास झाल्याचं ते सांगतात. 4 जुलै दिवशी सीमाला अटक झाली होती पण स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
ग्रेटर नोएडा मध्ये सध्या सीमा हैदरच्या या प्रकरणाची स्थानिक पोलिस आणि अॅन्टी टेररिस्ट स्कॉड तपास करत आहेत.