कोरोनाच्या (Coronavirus) उद्रेकामुळे यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना प्रत्यक्ष भेटून राखी (Rakhi) बांधणे शक्य नसल्याने मथुरेतील (Mathura) 501 विधवा महिलांनी रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर मोदींसाठी 501 हातांनी बनवलेल्या राखी आणि मास्क (Mask) पाठवले आहेत. या राख्यांवर पंतप्रधानांची प्रतिमा असून मास्क हा वृंदावनच्या (Vrindavan) मंदिरात तयार करण्यात आले आहेत, ज्यावर “सुरक्षित रहो” आणि “आत्मनिर्भर” असे संदेश लिहिलेले आहेत.वृंदावन येथील 'माँ शारदा' आणि 'मीरा सागभगिनी' आश्रमात राहणार्या वृद्ध विधवांच्या गटाने या राखी तयार केल्या आहेत. Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन निमित्त PM नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा !
गेल्या वर्षी या महिला मोदींना राखी बांधण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या होत्या परंतु यावर्षी ते शक्य होणार नाही, मागील वर्षी स्वतः मोदींना राखी बांधलेल्या छबी देवी यांनी याबाबत खेद व्यक्त करत म्हंटले की, "मागील पाच महिने आश्रमात दिवस काढत असताना निराशा वाटत होती पण मोदींसाठी राखी व मास्क बनवण्याच्या कामाने आश्रमात सर्व महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला होता, यावेळी प्रत्यक्ष शक्य नसले तरी आम्ही मोदींना राखी पाठवत आहोत, हे आमच्या भावनांचे प्रतिक आहे". छबी देवी या स्वतः 75 वर्षाच्या आहेत,त्यांना मागच्या वर्षी मोदींना राखी बांधण्याचा मान मिळाला होता.