Prime Minister Narendra Modi | File Image | (Photo Credits: ANI)

श्रावणी पौर्णिमेचा आजचा दिवस राखी पौर्णिमा म्हणून देशभर साजरा केला जाणार आहे. दरम्यान रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यामधील जिव्हाळा जपणारा एक सण आहे. त्यामुळे या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून त्याला तिचं रक्षण करण्याच्या कर्तव्याची आठवण करून देते. या दिवसाच्या मंगपर्वावर भारतामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शुभेच्छा संदेश दिले आहेत. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भारतवासियांना आजच्या रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा देऊन हा सण आनंदाने साजरा करण्याचं आवाहन केले आहे. Raksha Bandhan 2020 Wishes: रक्षाबंधनानिमित्त WhatsApp Messages, ,Wallpapers च्या माध्यमातून शेअर करून बहिण-भावाला द्या शुभेच्छा!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना रक्षा बंधनाचा सण हा बहीण-भावाच्या प्रेमाचा असल्याचं सांगत या निमित्ताने महिलेचा सन्मान आणि सुरक्षा यासाठी अधिक कटिबद्ध होऊ असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ट्वीट

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ट्वीट

यंदा भारतामध्ये अजूनही कोरोना व्हायरसचे संकट आहे. या संकटकाळामध्ये बहीण- भाऊ एकमेकांच्या आरोग्याची खबरदारी घेत व्हर्च्युअली रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. महाराष्ट्रातही जिल्हाबंदी कायम असल्याने एकमेकांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने सार्‍याच बहीण-भावंडांना भेटणं शक्य होत नसल्याने अनेक ठिकाणी व्हर्च्युअल जगातच रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे.