Raksha Bandhan (Photo Credits-File Images)

Raksha Bandhan 2020 Wishes: रक्षाबंधन हा सण बहिण-भावामधील अतूट नात्यासह प्रेम, विश्वासाचा दिवस मानला जातो. यंदा 3 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहिण भावाला हातावर राखी बांधून त्याचे औक्षण करते. तसेच यावेळी भावाच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा बहिणीकडून प्रार्थना केली जाते. तर भाऊ आपल्या बहिणीची नेहमीच सुरक्षा करेल असे वचन या दिवशी देतो असे म्हटले जाते. भावा-बहिणांच्या नात्यामधील या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी सुरुवात झालीच आहे. दरवर्षी श्रावण पौर्णिमेस रक्षाबंधन सण साजरा केला जातो. भारताच्या विविध ठिकाणी या सणाला कजरी पौर्णिमा, राखीपौर्णिमा अशा नावांनी संबोधले जाते.(Raksha Bandhan 2020: रक्षाबंधन निमित्त लॉकडाऊनमध्ये यंदा बहिणीसाठी ‘गिफ्ट’ घेण्याचा विचार करताय? या Gifts आयडिया ठरतील खास)

रक्षाबंधन साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा असून महाभारतात श्री कृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली होती.त्या जखमेतून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवाची पत्नी द्रौपदीने आपल्या साडीचा किनार फाडून श्रीकृष्णाच्या रक्ताने माखलेल्या बोटाला बांधले. त्यावेळपासून श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचे ठरवले. त्या प्रमाणे श्रीकृष्णाने द्रौपदीचे रक्षण केले. तर रक्षाबंधनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या आपल्या भावाबहिणीला शुभेच्छा!

Raksha Bandhan (Photo Credits-File Images)
Raksha Bandhan (Photo Credits-File Images)
Raksha Bandhan (Photo Credits-File Images)
Raksha Bandhan (Photo Credits-File Images)
Raksha Bandhan (Photo Credits-File Images)

या सणाला दृष्टीपरिवर्तनाचा सण असेही म्हटले जाते. कारण यावेळी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते त्यावेळी त्याची दृष्टी बदलते. राखी बांधणाऱ्या बहिणीकडे पाहून तो आपव्या बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वत:कडे घेतो. आपल्या बहिणीला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली नाही पाहिजे, आपली बहिण समाजामध्ये ताठ मानेने वावरली पाहिजे याची जबाबदारी घेतो. राखीचा धागा केवळ धागा, सुती धागा नसून ते एक शांततेचे, स्नेह, आपुलकी, प्रेम आणि पवित्रतेचे रक्षण करणारे पवित्र बंधन आहे.