दिल्ली: राजीव सातव यांच्याकडे मोठी जबाबदारी; काँग्रेस पक्षातील अनेकांच्या राजकीय भविष्याचा करणार फैसला
Rajiv Satav |

Delhi Legislative Assembly election, 2020: राजीव सातव (Rajiv Satav) यांच्यावर हायकमांड अर्थातच काँग्रेस पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. दिल्ली (Delhi) काँग्रेस तिकीट वाटप समिती (Congress Constitutes Screening Committe Delhi) अध्यक्ष म्हणून राजीव सातव यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर काँग्रेस पक्षाच्या दिल्ली तख्तावर एक मराठी चेहरा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. काँग्रेस अध्यक्षांनीच ही जबाबदारी आपल्याकडे दिल्याचे राजीव सातव यांनी निवडीनंतर म्हटले आहे.

राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातील माजी खासदार आहेत. सध्या त्यांच्यावर गुजरात काँग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या रुपात भाजपचा झंजावत निर्माण झाला होता. या झंजावतापुढे काँग्रेस पक्षाचा देशभरात दारुण पराभव झाला. मात्र, अशा झंजावताविरुद्धही राजीव सातव हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूक 2014 मध्ये महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचे केवळ 2 खासदारच निवडूण आले. हिंगोलीतून राजव सातव तर, नांदेड लोकसभा मतदारसंघातून अशोक चव्हाण अशी या दोन खासदारांची नावे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये लोकसभा सभागृहात काँग्रेस पक्षाची ताकत प्रचंड घटली होती. त्यामुळे अत्यंत कमी खासदारांच्या जीवावर विरोधी पक्षाचा किल्ला काँग्रेसला लढवावा लागत होता. या काळात राजीव सातव हे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा सहवास जवळून लाभला. त्यातून त्यांना पक्षाची विविध जबाबादारी मिळत गेली. ते गुजरात काँग्रेसचे प्रभारीही झाले. राजीव सातव लोकसभा निवडणूक 2019 लढले नाहीत. परंतू, त्यांच्यावरील पक्षाची जबाबदारी मात्र कायम राहिली. (हेही वाचा, छत्तीसगड: राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सव कार्यक्रमात राहुल गांधी थिरकले; पारंपरिक वाद्य वाजवत धरला ताल (Watch Video))

नजीकच्या काळात होऊ घातलेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारांना तिकीट वाटप करण्याची मोठी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी राजव सातव यांच्याकडे असणार आहे. असे म्हटले जाते की दिल्ली दरबारी राजकारण महाराष्ट्राला शक्यतो फारसे पुढे येऊ देत नाही. किंवा दिल्लीतील राजकारणात महाराष्ट्राच्या नेत्यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. परंतू, राजीव सातव यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण अंदाजात दिल्लीतील वर्तुळाशी जमवून घेतले आहे. त्यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सातव यांचे अभिनंदन केले जात आहे.