मागील आठवड्यात पावसामुळे (Rain) महाराष्ट्रात (Maharashtra) अतोनात नुकसान झाले आहे. पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे जीवीतहानी झाली आहे. तसेच अनेक कुटूंब उद्धवस्त झाली आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी दरडी कोसळल्याने पुर्ण गावे मातीखाली गाडली गेली आहेत. या घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसामुळे निगडीत मृतांची (Dead) संख्या बुधवारी 213 वर गेली आहे. एकट्या रायगड (Raigad) जिल्ह्यातच जवळपास 100 मृत्यूची नोंद झाली आहे. अशी माहिती राज्य सरकारने (State Government) दिली आहे. अधिकृत प्रकाशनानुसार आठ लोक अद्याप बेपत्ता आहेत.
20 जुलैपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या बर्याच भागांमध्ये, विशेषत: किनारपट्टीच्या कोकण आणि पश्चिम जिल्ह्यात मुसळधार पूर आणि भूस्खलन झाले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 213 मृत्यूंपैकी रायगड जिल्ह्यात सर्वाधिक 95, साताऱ्यामध्ये 46, रत्नागिरीत 35, ठाणे जिल्ह्यात 15 कोल्हापूर 7, मुंबई 4, पुणे 3, सिंधुदुर्ग 4 आणि पूर्व महाराष्ट्रातील वर्धा आणि अकोला जिल्ह्यात प्रत्येकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
आठ लोक अद्याप बेपत्ता आहेत. तर 52 जखमींवर विविध सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे निवेदनात म्हटले आहे. बहुतेक मृत्यू रायगड, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे झाले आहेत. निवेदनात म्हटले आहे की, पूरात एकूण 61,280 पाळीव प्राणी मारले गेले आहेत. त्यापैकी बहुतेक सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. एकट्या सांगली जिल्ह्यात 2,11,808 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यात एकूण 4,35,879 लोकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे.
काही जण कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पुराचा बळी गेले आहे. त्यात म्हटले आहे की 1 जूनपासून महाराष्ट्रात पावसाशी निगडित घटनांमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात झालेल्या या जोरदार पावसांनंतर आता स्थिती आटोक्यात यायला सुरूवात झाली आहे. मात्र रायगड आणि चिपळूम सारख्या शहरात पुर्ण जनजीवनच विस्कळीत झाल्याने अनेक लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे चित्र असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू झाला आहे.