Rahul Gandhi On PM Narendra Modi: कोरोना बाधितांंचा आकडा 50 लाख होईल पण मोदी मोरासोबत व्यस्थ आहेत; राहुल गांंधी यांंचं जळजळीत ट्विट
Rahul Gandhi And Narendra Modi (Photo Credits-Twitter)

Parliament Monsoon Session 2020:  आजपासुन संसदेच्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे, मात्र सोनिया गांंधी (Sonia Gandhi)  मेडिकल चेक अप मुळे तर राहुल गांंधी (Rahul Gandhi) हे सोनियांंसोबत परदेशी गेल्याने दोन्ही प्रमुख कॉंंग्रेस नेते अधिवेशनाला अनुपस्थित आहेत. असं असलं तरी ट्विटर वरुन आपला विरोध दर्शवण्याचे काम विरोधी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांंधी चोख करत आहेत. काही वेळापुर्वी राहुल यांंनी एक ट्विट करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांंच्यावर आपले टीकास्त्र सोडले आहे. येत्या आठवडयात देशात कोरोना बाधितांंची संख्या 50 लाख होईल तसेच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंची संख्या सुद्धा 10 लाख होईल असे कयास बांंधत असताना राहुल यांंनी मोदींंवर चांंगलंच तोंंडसुख घेतलं आहे.

Parliament Monsoon Session 2020: संसदेच्या 18 दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात, कोरोनामुळे यंदा केलेले बदल पाहा

राहुल गांंधी यांंनी ट्विट मध्ये लॉकडाउन ला अनियोजित म्हणत, देशात कोरोना पसरणे हे एकाच व्यक्तिच्या अहंंकाराचा परिणाम असल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार देशवासियांंना आत्मनिर्भर बनण्याचे सांंगतेय कारण तुम्हालाच तुमचे प्राण वाचवायचे आहेत मोदी स्वतः तर फक्त मोरासोबत व्यस्थ आहेत अशा शब्दात राहुल यांंनी मोदींंना बोल लावले आहेत.

राहुल गांंधी ट्विट

दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या आधी 8 सप्टेंंबर रोजी कॉंंग्रेस नेत्यांंची बैठक घेण्यात आली होती यावेळी संसदेच्या अधिवेशनात मांंडायचे विविध मुद्दे जसे की भारत चीन तणाव, कोरोनाचे वाढते आकडे आणि घसरता GDP याबद्दल चर्चा झाली होती, मात्र अधिवेशनात यंंदा कोरोनामुळे प्रश्न उत्तरांंचा तास रद्द केल्याने या मुद्द्यांवरुन कॉंग्रेसला संंसदेत विरोध दर्शवता येतो का हे पाहावे लागेल.