कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे लांंबणीवर पडलेले संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Monsoon Session 2020) आजपासुन सुरु होत आहे. काही वेळापुर्वीच पंंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संसदेत दाखल झाले आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळेस गृहमंंत्री अमित शाह (Amit Shah) हे अधिवेशनात अनुपस्थित असतील. प्राप्त माहितीनुसार हे पावसाळी अधिवेशन 18 दिवसीय असेल त्यामध्ये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी सुद्धा अधिवेशन भरवले जाणार आहे. या काळात मोदी सरकारने मार्चपासून जारी केलेल्या अध्यादेशांची पुनर्स्थापना करणार्या 11 विधेयकांसहित 23 नवीन कायदे विचार आणि चर्चेसाठी मांंडले जाणार आहेत.कोरोना संकट लक्षात घेता अधिवेशनाच्या नियमांमध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. याविषयी आपण सविस्तर जाणुन घेउयात.
कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यापासुन घेण्यात येणारे हे पहिले अधिवेशन असणार आहे. या पावसाळी अधिवेशनानिमित्त लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही सभागृहांंचे वेगवेगळे सत्र भरवले जाईल. दोन्ही सभागृहांंचे सत्र हे रोज प्रत्येकी चार तासाचे असेल, प्रोटोकॉल नुसार या अधिवेशनाच्या आधी घेण्यात येणारी एक सर्वपक्षीय बैठक यंंदा रद्द करण्यात आली होती. तसेच अधिवेशनाच्या दरम्यान यंदा प्रश्नउत्तरांंचा तास रद्द असेल, Zero Hour ची वेळ सुद्धा अर्ध्या तासाची ठेवण्यात येणार आहे.
ANI ट्विट
#MonsoonSession of the Parliament begins. pic.twitter.com/d3CfaQT9v1
— ANI (@ANI) September 14, 2020
दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या आधी सर्व खासदारांंना आपली कोरोना चाचणी करुन घेण्यास सांंगण्यात आले होते. संसदेत प्रवेशाच्या आधी आपल्या कोरोना चाचणीचे अहवाल दाखवणे खासदारांंना अनिवार्य करण्यात आले आहे. वरील फोटोमध्ये आपण पाहु शकता की सभागृहात सोशल डिस्टंंसिंग सह मास्क चा वापर करुन सर्व खासदार दाखल झाले आहेत.
दुसरीकडे, खासदारांंची उपस्थिती फारच कमी दिसुन येतेय.अधिवेशनाच्या पुर्वीच लोकसभेचे पाच खासदार कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले होते. विरोधी पक्ष कॉंंग्रेस प्रमुख सोनिया गांंधी या सुद्धा आरोग्य तपासणीसाठी परदेशी गेल्या आहेत खासदार राहुल गांंधी सुद्धा सोनिया यांंच्यासोबत गेले आहेत त्यामुळे विरोधी पक्षाचे दोन्ही मुख्य नेते अधिवेशनात उपस्थित नसतील.