Parliament Session 2020: कालावधी कमी असला तरी संसद अधिवेशनात सखोल चर्चेला प्राधान्य, सर्व खासदारांचे आभार- पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi | (Photo Credits: ANI)

एका विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन (Parliament Session 2020) पार पडत आहे. एका बाजूला कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आहे. दुसऱ्या बाजूला कर्तव्य आहे. संसदेतील सर्व खासदारांनी कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी, सखोल चर्चा आणि संसदेची परंपरा याला बाधा येणार नाही, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, शहीद झालेल्या 20 जवानांच्या कुटुंबीयांसोबद देश उभा आहे. तसेच, आपले जवान सीमेवर मोठ्या धैर्याने आव्हानांचा सामना करत आहेत. जवानांच्या पाठीशी अवघा देश ठामपणे उभा आहे, असेही पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले, एका विशिष्ट वातावरणात हे अधिवेशन पार पडत आहे. सर्व नियम, अटी आणि सुरक्षीतता पाळून अधिवेशन पार पडले. विविध विषयांवर चर्चा करण्यास प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही विषयावर सखोल चर्चा केल्यामुळे त्या विषावर अधिक चांगले काम होते, त्यामुळे चर्चेला प्राधान्य दिले जाईल असेही पंतप्रधान म्हणाले. (हेही वाचा, Parliament Monsoon Session 2020: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी खासदारांना Coronavirus ची लागण; कोविडमुळे फक्त 4 तासच चालणार सेशन)

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिक काटेकोरपणे नियम व अटी पाळून अधिवेशन पार पडणार आहे. त्यासाठी सर्व खासदारांना कोरोना व्हायरस चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्या खासदारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह येईल त्यांनाच संसद आवारात प्रवेश दिला जाणार नाही. काही खासदारांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यांना संसदेत प्रवेश देण्यात आला नाही.

दुसऱ्या बाजूला संसदेच्या राज्यसभा या वरिष्ठ आणि लोकसभा या कनिष्ठ सभागृहांच्या कामकाजाची वेळही वेगवेगळी असणार आहे. एक सभागृह सकाळी 9 ते दुपारीकामकाज स्थगित करेपर्यंत तर दुसरे दुपारी 3 ते पुढे कामकाज स्थगित करेपर्यंत सुरु राहणार आहे. सभागृहात खासदारांच्या आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. जेणेकरुन सोशल डिस्टंन्सींग पाळले जाईल. तसेच, कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे.