Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter/ANI)

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंततर काँग्रेस सरकारचा शपथविधी बंगळुरु येथे आज (20 मे) पार पडला. काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah ) यांनी मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला काँग्रेसचे मान्यवर नेते होते. दरम्यान, या कार्यक्रमावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनांची पुनरावृत्ती केली. तसेच, ही आश्वासने हे सरकार दोन तासात पूर्ण करेन अशी ग्वाहही दिली.

बंगळुरु येते पार पडलेल्या या शपथविधी सहळ्यात काँग्रेसच्या आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यांत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या शपथांचा समावेश आहे.

वायनाडमधून खासदारकी रद्द झालेले खासदार, राहुल गांधी यांनी स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त सरकारचे आश्वासन दिले आणि असेही सांगितले की कर्नाटक मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांबाबत कायदे केले जातील. (हेही वाचा, Karnataka CM Oath Ceremony: सिद्धरमय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री, कर्नाटकमध्ये काँग्रेसचा आज भव्य शपथविधी सोहळा; कोणकण राहणार उपस्थित घ्या जाणूनमंत्रीपदाची शपथ)

ट्विट

राहुल गांधी यांनी म्हटल की, आम्ही तुम्हाला 5 आश्वासने दिली होती. मी म्हणालो होतो की आम्ही खोटी आश्वासने देत नाही. आम्ही जे बोलतो ते आम्ही करतो. 1-2 तासात, कर्नाटक सरकारची पहिली कॅबिनेट बैठक बोलावली जाईल. या बैठकीत . कायदा बनवला जाईल.

व्हिडिओ

बेंगळुरू येथील कांतीराव स्टेडियमवर झालेल्या समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आमदारांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली, तर डीके शिवकुमार यांनी एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि राज्यपालांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात आले. उल्लेखनिय असे की, शपथ घेतलेल्या आठ आमदारांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांचा समावेश आहे. यावेळी प्रियांका गांधी वड्रा यांच्यासह अशोक गेहलोत, भूपेश बघेल आणि सुखविंदर सिंग सुखू यांच्यासह इतर काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.