Rahul Gandhi On CAA: राहुल गांधी यांचा इशारा, 'हम दो हमारे दो' यांना सीएए लागू करु देणार नाही
Rahul Gandhi | ( Photo Credits: Twitter/ ANI)

काँग्रेस (Congress) पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन (CAA ) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते असम राज्यातील शिवसागर येथील रॅलीत रविवारी (14 फेब्रुवारी) बोलत होते. या वेळी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले, हा जो माझ्या गळ्यात गमछा आहे त्यावर सीएए लिहिले होते आणि त्यावर क्रॉस करुन खाट मारण्यात आली होती. आम्ही केंद्र सरकारला सांगतो की, या राज्यात आम्ही सीएए (Rahul Gandhi On CAA) कधीही लागू होऊ देणार नाही. नजिकच्या काळात असम राज्यात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

असम येथील रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की आम्ही हम दो हमारे दो वाल्या लोकांना देशात कधीही सीएए कायदा लागू करु देणा नाही. भाजपवर टीका करताना त्यांनी म्हटले की, त्यांचे ध्येय स्पष्ट आहे. असममध्ये दंगे करा, हिंसाचार करा असमला विभागा आणि असममध्ये जे काही आहे ते मिळवा. त्यांना असे वाटते की असममध्ये असे काहीही केले तरी त्यांचे प्रयत्न तडीस जातील परंतू तसे होणार नाही. आम्ही तसे होऊ देणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Rahul Gandhi in Lok Sabha: राहुल गांधी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र म्हणाले 'सरकार केवळ 'हम दो, हमारे दो' यांच्यासाठी काम करतंय')

केरळ येथील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले की , जगातील कोणतीही ताकद असम राज्याला तोडू शकत नाही. जे काही लोक आज समाजात तिरस्कार पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना काँग्रेस पक्ष धडा शिकवेन. पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्षाने असम राज्याला एकजुट केले आहे. या आधी मोठ्या प्रमाणावर सभा घ्यायची तर आव्हान असायचे की सभेला आलेला व्यक्ती सुरक्षीत घरी पोहोचेल किंवा नाही. पण आता परिस्थीती बदली आहे.

पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हटले की, काँगेसचे सर्व कार्यकर्ते सामाजिक सिद्धांताचे रक्षण करतील. आम्ही एक इंचही मागे हटणार नाही. राहुल गांधी यांनी म्हटले की, भाजप आणि आरएसएस देशाची विभागणी करु पाहात आहेत. परंतू आम्ही त्यांचा प्रयत्न कधीच तडीस जाऊ देणार नाही.