Rahul Gandhi on Narendra Mod | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

काँग्रेस (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) आता मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) पोहोचली आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी करत असलेल्या भाषणात त्यांचा आत्मविश्वास लोकांना दिसतो आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या भाषणात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi Mimics PM Narendra Modi) यांची मिमिक्री करताना दिसत आहेत. आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी 'भाईयो और बहनो.. मित्रो..' म्हणत उपस्थितांना साद घातली. त्यांनी हे शब्द उच्चारताच उपस्थित जनसमूदयातून एकाच वेळी टाळ्या, शिट्या असा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. राहुल गांधी या वेळी थकव्यावरुन त्यांना विचारलेल्या मुद्द्यावरुन बोलत होते.

मध्यप्रदेशातील एका सभेतून बोलताना राहुल गांधी सांगतात की, काँग्रेस नेते कमलनाथ यांनी त्यांना प्रश्न विचारला की, तुम्हाला थकवा येत नाही? या प्रस्नाचे उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले 'भाईयो और बहनो.. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर थकवा दिसतो? मी दररोज सकाळी लवकर उठतो. भरपूर चालतो. मला थकवा येत नाही. महत्त्वाची बाब अशी की मी सकाळी ज्या गतीने चालतो त्याहीपेक्षा अधिक गतीने सायंकाळी चालतो', असेही राहुल गांधी म्हणाले. (हेही वाचा, Bharat Jodo Yatra: प्रियंका गांधी पती रॉबर्ट वढेरा यांच्यासह 'भारत जोडो' यात्रेत सहभागी, मुलगा Raihan Vadra याचाही समावेश)

राहुल गांधी याच सभेत सांगतात, आतापर्यंत मी दोन हजार किलोमीटर चालसलो आहे. पण मला तिळमात्रही थकवा नाही. मी दररोज सकाळी उठून चालायला सुरुवात करतो. मला एक सेकंदही थकवा जाववलेला नाही. हे असं का होतं हे मला माहिती नाही. दरम्यान, या वेळी उपस्थित जनसमुदयाकडून त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. दरम्यान, उपस्थितांच्या प्रतिसादामुळे काही काळ राहुल गांधी यांच्या भाषणात अडथळाही आला. या वेळी ते लोकांना ऐका असे सांगत होते. सांगता सांगता त्यांनी मिष्कीलपणे 'भाईयो और बहनो..मित्रो...' म्हटले. त्यांनी असे म्हणताच उपस्थितांकडून आणखी जोरदार प्रतिसाद आला.

ट्विट

राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. काँग्रेस मीडिया प्रभारी सुप्रिया श्रीनेत यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडिओला अनेक लाईक्स आणि पेज विव्ह्स मिळाले आहेत. लोक या व्हिडिओ खाली प्रतिक्रियाही मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत.