Bharat Jodo Yatra: प्रियंका गांधी पती रॉबर्ट वढेरा यांच्यासह 'भारत जोडो' यात्रेत सहभागी, मुलगा Raihan Vadra याचाही समावेश
Priyanka Gandhi | (Photo Credit: ANI)

काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) आज गुरुवारी (24 नोव्हेंबर) मध्य प्रदेशातील बोरगाव (Borgaon in Madhya Pradesh) येथून सुरुवात झाली. यात्रेचा आज 78 वा दिवस आहे. येत्या 10 दिवसांत ही यात्रा मध्यप्रदेश राज्यातील 7 जिल्ह्यांतून जाणार आहे. राहुल गांधी यांची बहिण आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा (Priyanka Gandhi Vadra) आपले पती रॉबर्ट वढेरा (Robert Vadra) आणि मुलगा रिहान (Raihan Vadra) यांच्यासह या यात्रेत सहभागी झाल्या.

प्रियांका गांधी वढेरा आज सकाळी त्यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत सामील झाल्या हे विशेष. 7 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या यात्रेने आपला महाराष्ट्र टप्पा पूर्ण करून आता भाजपशासित मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. खरगोनला जाण्यापूर्वी राहुल गांधी स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी आयकॉन तंट्या भील (Tantia Bhil) यांच्या जन्मस्थाळाला भेट देतील.

दरम्यान, भारत जोडो यात्रा 5 डिसेंबरला राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. याआधी ही यात्रा मध्य प्रदेशातील पाच लोकसभा मतदारसंघातून भारत फिरणार आहे. त्यात खांडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि देवास यांचा समावेश आहे. या सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत हे विशेष. काँग्रेसची भारत जोडो यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली आणि केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमधून मध्य प्रदेशात पोहोचली आहे.  (हे ही वाचा:- 'राहुल गांधी जोपर्यंत सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना मुंबईत येऊ देणार नाही'- MP Rahul Shewale)

ट्विट

दरम्यान, राहुल गांधी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. ज्यात राहुल गांधी हे नरेंद्र मोदींची नक्कल करताना दिसतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत राहुल गांधी उपस्थित लोकांना आपला दिनक्रम सांगत आहेत. यावेळी ते असं म्हणताना दिसत आहेत की, 'कमलनाथ यांनी मला विचारलं, तू थकत नाहीयेस का..? भैयो और बनो...माझ्या चेहऱ्यावरचा थकवा तुम्हाला दिसतो का...मी रोज सकाळी लवकर उठतो आणि खूप चालतो, पण मला थकवा जाणवत नाही.'