केंद्र सरकारने (Central Government) मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यावरुन काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी (21 जुलै) जोरदार टीकास्त्र सोडले. कृषी कायद्याचा (Agricultural Law) विरोध करताना शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जाणार नाही, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेवर जोरदार टीकास्त्र सोडत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ज्यांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले आहे त्यांच्या डोळ्यातील आश्रूंमध्ये खूप काही दिसते. त्यांनी केंद्र सरकारवरुन ट्विटरवर हल्ला चढवताना Farmers Protest असा हॅशटॅगही वापरला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटसोबत एका वृत्तपत्रातील वृत्ताची प्रतिमाही ट्विटसोबत पोस्ट केली आहे. या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, सरकारने एका लिखित उत्तरात म्हटले आहे की, त्यांच्याजवळ अशी कोणतीही आकडेवारी नाही. सरकारला विचारण्यात आले होते की, पाठिमागील नोव्हेंबर महिन्यापासून सुरु असलेल्या आंदोलनात अनेक शेतकरी आंदोलनात आजारी पडले. मृत्यूमुखी पडले. त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi on PM Narendra Modi: 'सदियों का बनाया,पलों में मिटाया' राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकारवर टीका)
राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवर अनेक शेतकरी पाठीमागील वर्षातील 26 नोव्हेंबरपासून कृषी कायद्याविरोधात लढाई लढत आहे. केंद्र सरकारने मंजूल केलेले नवे कृषी कायदे परत घ्यावेत यासाठी हे शेतकरी आंदोलनाला बसले आहेत.
राहुल गांधी ट्विट
अपनों को खोने वालों के आँसुओं में सब रिकॉर्ड है।#FarmersProtest pic.twitter.com/w30bDXO0F7
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 21, 2021
दरम्यान, केंद्र सरकारने विविध मुद्द्यांवरुन घेतलेली भूमिका, निर्णय यावर राहुल गांधी यांनी वेळवेळी टीका केली आहे. कोरोना व्हायरस महामारी नियंत्रणासाठी सरकाला कथीत स्वरुपात आलेले अपयश, आवश्यक औषधांचा काळाबाजार, इंधन दरांच्या वाढत्या किमती यांसारखे मुद्दे असतील किंवा भारत चीन सीमा वादाचा विषय. राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरत टीका केली आहे. याच आठवड्यात राहुल गांधी यांनी खाद्य तेलात दरात झालेल्या वाढीवरुन ट्विट केले होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'खाल्लेही, मित्रांना खाऊ घातलेही. फक्त जनतेला खाऊ देत नाहीत.' या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी PriceHike हा हॅशटॅगही वापरला होता.